पॉवर टान्सफार्म बसविला | महावितरणचे प्रयत्न फत्ते ; शहरात विज पुरवठा सुरळीत

0
जत,संकेत टाइम्स : गेल्या सात दिवसापुर्वी महावितरणच्या जतच्या मुख्य विज‌ वितरण प्रणालीचा २५ एमव्हीए क्षमता असलेला पॉवर टान्सफॉर्म फेल झाल्याने ९ फिटर बंद पडले होते.अखेर सात दिवसाच्या प्रयत्नानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुर्ण क्षमतेने काम करून अजस्ञ टान्सफार्म बसवत आज शुक्रवार दुपारपासून शहरासह अचनहळ्ळी, रामपूर,अमृत्तवाडी परिसराचा विजपुरवठा उच्च दाबाने सुरळीत केला आहे.

 

 

गत आठवड्यातील शनिवार ता.९ रोजी
जत शहरासह परिसरातील विज पुरवठा करणारा महावितरणाचा पॉवर टान्सफर बंद पडला,त्यामुळे शहरासह रामपूर,मल्याळ,अचनहळ्ळी, अमृतवाडी येथील विजपुरवठा खंडित झाला होता.
हा पॉवर टान्सफर बसविण्यासाठी तब्बल ७ दिवसाचा कालावधी लागत असल्याने
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी डफळापूर, पाच्छापूर,शेगाव,कुंभारी येथील सब स्टेशनचा विजपुरवठा जोडून शहरातील विज पुरवठा तात्पुरता सुरू केला होता.

 

 

 

मात्र उच्च दाबाने विजपुरवठा नसल्याने अनियंत्रित झाला होता.शहरातील छोटे-मोठे उद्योग,पतसंस्था,शासकीय कार्यालये, बँकासह,व्यापाऱ्यासह शेती पंपानाही फटका बसला होता.शहरातील पाणी पुरवठावरही त्याचा मोठा परिणाम झाला होता.
मात्र महावितरणच्या जत विभागाचे‌ अधिकारी,कर्मचारी यांनी रात्रन् दिवस कष्ठ घेत गेल्या आठ दिवसापासून विजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

 

 

तोपर्यत बंद पडलेला पॉवर टान्सफर अतीत(कराड) एमआयडीसीतून मागविण्यात आला.पुर्वीचा टान्सफर काढण्यात आला.मंगळवारी हा अजस्ञ टान्सफार्म जतमध्ये आला.नव्या तंत्रज्ञानाने तो बुधवारी बसविण्यात आला.गुरूवारी त्याची चाचणी घेण्यात आली.शुक्रवारी सकाळी इतर स्टेशनमधून घेतलेला विज पुरवठा तोडण्यात आला.दुपारी तीन वाजता शहराचा विजपुरवठा पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे.
संमात्तर यंत्रणा गरजेची
जत शहरातील मोठी लोकसंख्या,एमआयडीसी
अनेक शासकीय कार्यालये,बँका,पतसंस्था, उद्योग,व्यापारी यांच्याकडून विजेची मोठी मागणी आहे.त्यांची वसूलीही मोठी असते.टान्सफार्म जळाल्याने यांचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.
त्यामुळे शहरातील विज पुरवठा अशा पध्दतीने बंद पडू नये यासाठी संमात्तर यंत्रणा महावितरण कडून बसविण्याची गरज आहे.
जत महावितरणचा बसविण्यात आलेला नविन पॉवर टान्सफार्म
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.