सरकारने वेळ न गमावता कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा

0

कंगना रनौटने प्रसिद्धीसाठी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळन्याचे काम केले  व  मिडिया समोर चर्चेत रहाली.परंतु सध्याच्या घृणास्पद वक्तव्यामुळे कंगनाने देशाचा अपमान करून देशाची आन,बान व शानला ठेस पोहचविण्याचे काम केले.कारण आपल्याला जे स्वतंत्र मिळाले त्याकरिता क्रांतीकारकांना, योध्यांना,थोर पुरूषांना,शहिदांना 150 वर्षाचा संघर्ष करावा लागला.तेव्हा भारत 1947 ला स्वतंत्र झाला व आपण मोकळा स्वास घेवू लागलो.परंतु सध्या कंगना राष्ट्रप्रेम व देशप्रेम पुर्णपणे विसरल्याचे त्यांच्या आताच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसुन येते.

 

माझ्या माहिती नुसार कंगनाला स्वतंत्र्याची व स्वतंत्र भारताची परिभाषाच अवगत नसावी.कंगना रानौट ही अभिनेत्री नसुन एका विहीतील बेडूक असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते.कंगना रानौट आपल्या आयुष्यात कधीच असली घोड्यावर बसली नाही व असली तलवार पहाली नसावी.जी कंगना लाकडी घोड्यावर बसून व लाकडी तलवार घेऊन झाशिची रानी  चित्रपट बनवीते तीला स्वातंत्र्याची परीभाषा कशी काय  समजणार! 1947 ला भारताला भिक मिळाली,खरे स्वतंत्र 2014 मध्ये मिळाले.असे वादग्रस्त विधान एका कार्यक्रमात केले. या विधानामुळे स्पष्ट दिसुन येते देशांच्या 135 कोटी जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.कारण हा अपमान 135 कोटी जनतेचा, शहिदांचा,स्वातंत्रता सेनानींचा व आपल्या पुर्वजांचा आहे.कंगनाने महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, खुदीराम बोस, राजगुरू, चंद्रशेखर आझाद इत्यादीसह लाखो स्वातंत्रता सेनानी व शहिदांचा घोर अपमान केला आहे.1947 ला भारताला सहज स्वातंत्र्य मिळाले नाही तर यात अनेक 18 वर्ष वयोगटातील युवक शहिद झालेत व अनेक युवकांनी देशांच्या स्वातंत्र्यासाठी आपला संपूर्ण परिवारीचे बलीदान दिले.

 

भारताच्या स्वतंत्र लढ्याची गाथा संपूर्ण जगावेगळी आहे.त्यामुळे कंगना रानौटला शर्म वाटायला पाहिजे की 1947 ची तुलना 2014 सोबत करने हा कीती मोठा गुन्हा असावा.कंगना रानौटच्या वक्तव्याने शहिदांचा, स्वातंत्र्य सेनानींचा व स्वतंत्र भारताचा आणि तिरंग्याचा घोर अपमान केला आहे.सरकने कंगनाला एकतर पागल खाण्यात ताबडतोब डांबले पाहिजे अन्यथा देशद्रोहाचा खटला दाखल करून आजन्म कारावासची सजा द्यायला हवी.ही संपूर्ण प्रक्रिया फास्ट ट्रॅक कोर्टातच्या माध्यमातून व्हायला हवी.स्वतंत्र भारत हा 1947 चा आहे त्यामुळे कंगनाने स्वतंत्र भारतात राहण्याचा संपूर्ण अधिकार गमावलेला आहे. कंगनाची जागा आता फक्त जेलमध्येच असायला हवी. कंगनाला राष्ट्रपतींच्या हस्ते चांगल्या कामांकरिता पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.परंतु आता कंगनाने वाईट व देशद्रोहाचे काम केले आहे.त्यामुळे पद्यश्री पुरस्कार वापस घेऊन व देशद्रोहाचा खटला दाखल करून वेळ न गमावता जेलमध्ये टाकण्याची शीफारस राष्ट्रपतींच्या मार्फतच व्हायला हवी.कारण “1947 मध्ये भारताला भीक मिळाली, परंतु खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले” हे वक्तव्य फक्त भारतवासीयांनीच नाही तर संपूर्ण जगाने ऐकले आहे.त्यामुळे राष्ट्रपतींनी कंगनावर ताबडतोब कारवाई करून देशद्रोहाच्या गुन्ह्यखाली जेलमध्ये टाकले पाहिजे.

 

असेही सांगण्यात येते की कंगणाचे आजोबा स्वतंत्र लढ्यामध्ये होते ह्या गोष्टी तीला दिसल्या नाहीत काय?आज महात्मा गांधींना संपूर्ण जग नमन करते कारण एक धोती आणि एक काठीच्या भरोशावर अहिंसेच्या माध्यमातून स्वतंत्र मिळविले.त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अहिंसेचे पुजारी संबोधल्या जाते.भारत स्वातंत्र्य करण्यासाठी अहिंसावादी, क्रांतीकारी,मवाळवादी,जहालवादी असे अनेक विचारांचे थोर पुरुष व क्रांतीकारक होते.परंतु सर्वांचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करने व त्या पध्दतीने सर्वांनीच आपली कंबर कसली आणि जीवाची पर्वा न करता अनेक शहिद झाले.

 

त्यांच्याच पुण्यायीने 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.आज आपण अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजेच 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.ते 2014 मुळे नसुन 1947 मुळे अमृतमहोत्सव होत आहोत.कारण 1947 पासून 2022 पर्यंत 75 वर्षे होतात व 2014 पासून 2022 पर्यंत फक्त 8 वर्षे होतात.त्यामुळे कंगना रनौटला लाज वाटायला पाहिजे की भारत स्वतंत्र व्हायला कीती वर्षे झाले असावीत. मला तर असे वाटते की कंगणा रनौट रोज सकाळ-संध्याकाळ नशेचे सेवन करीत असावी.कंगना रनौटला समजायला पाहिजे की अभिनय करने व रीयल जीन्दगी यात जमीन आसमानचा फरक असतो.अभिनयात म्हणजेच चित्रपटात तुम्ही काहीही दाखवु शकता खऱ्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्रता सेनानी व शहिदांनी आपल्या रक्ताचा एक एक थेंब देशासाठी अर्पीत केलेला आहे.अशावेळी कंगना असो वा कोनीही असो स्वतंत्र लढ्याबद्दल जर घृणास्पद वक्तव्य करीत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून आजन्म कारावासची सजा द्यायला हवी.कारण असे घृणास्पद वक्तव्य म्हणजे स्वतंत्रता सेनानींचा व स्वतंत्र भारताचा घोर अपमान आहे.कंगनाने इतिहासकार बनण्याची घाई करू नये.

 

 

कारण इतिहासकार बनण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करावा लागतो.अभीनेत्री बनण्याने किंवा चित्रपट काढल्याने इतिहासकार होत नसते.कंगनाच्या सन 1947 मध्ये भारताला भीक मिळाली, खरे स्वतंत्र तर सन 2014  मध्ये मिळाले.या विधानाचे सर्वच राजकीय पक्ष-विपक्षांकडून, हॉलिवूडक्षेत्र, बॉलीवूड क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रातुन कंगनाचा बहिष्कार व्हायला हवा व बॉलीवूड क्षेत्रातील संपूर्ण दरवाजे कंगनासाठी बंद करायला हवे.कारण बॉलीवूड क्षेत्रासाठी कंगना रनौट आता  अभिनेत्री नसुन खलनायक झाली आहे.कंगनाने दिडशे वर्षांच्या संघर्षाला दिड मिनीटाच्या वक्तव्याने शहिदांच्या आत्म्याला दु:खी केले.                                                                                                                
 
रमेश कृष्णराव लांजेवार.                                     
माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर
9921690779
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.