रस्त्यांवरील खांब अन् अतिक्रमणेही कधी हटणार ? | मुख्य रस्तावरच उभ्या डिपी ; वाहतूकीला मोठा अडथळा ; कायम धोका .!

0

जत : शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले. परंतु तेथील विद्युतखांब हे वर्षानुवर्षे त्या रस्त्यांच्या पूर्ण वापराला मोठा अडसर ठरत आहेत. वीज कंपनी आणि पालिकेच्या अधिकार्‍यांनी जणू त्याचा आधार घेत अतिक्रमणधारकांना सोयीस्कर सूट दिल्याचेच चित्र आहे .  यामुळे शहरातील हे रस्ते अपघाताचे सापळेच बनले  आहेत.आता ऊर्जामंत्र्यांनी पदभार घेताच असे सर्व धोकादायक विद्युतखांब व डिपी हटविण्याचे आदेश दिले होते.मात्र याला जत शहर अपवाद राहिले आहे. यामुळे हे खांबांचे स्थलांतर आणि त्याआडून चालणार्‍या अतिक्रमणांचे अडथळे दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पंरतू यालाही संबधित विभागाकडून आदेशाची अंमलबजावणी करण्याची मानसिकता नसल़्याने ते आजअखेर रस्त्यांवर अपघाताला निमंत्रण देत उभे आहेत.शहराच्या खुंटलेल्या विकासाला जशी विविध कारणे आहेत.

 

 

त्यापैकीच अरुंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडी हे एक प्रमुख कारण आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष पुढे नगरपालिका निर्माण होऊन जैसे – थैच स्थिती आहे . तीच शहराची डोकेदुखी आहे. विकास आराखड्याअंतर्गत डीपी रस्ते आणि मुख्य मार्गांचे रुंदीकरण अनेकवेळा कागदावर आले. परंतु ते अंमलात आल्याचे अपवादाने झाले .शहरातील विजापूर – गुहागर ,जत- सांगली ,जत- बिंळूर ,जत – बिळूंर तसेच शहरातील मुख्य मार्गावरील विज वितरण कंपनीच्या डिपी ,अतिक्रमणे जैसे-थैच स्थितीत आहेत .

 

 

अशा अनेक मुख्य मार्गांचा प्रश्न गंभीर आहेत. हे रस्ते रुंदीकरणाचे अनेक वर्षे भिजत घोंगडे राहिले. त्यानंतर गेल्या काही वर्षांंत काही मार्गाचे कामे मार्गीही लागले. त्यानुसार सर्व रस्त्यांची अतिक्रमणे हटविण्यात आली .  मात्र परत काही दिवसानंतर पुर्वीचीच स्थिती निर्मान झाली आहे. रस्त्यांच्या मध्येच असलेले विद्युतखांब जणू या रुंदीकरणाला खोडा घालणारेच ठरले आहेत. ते अजूनही तसेच उभे आहेत . त्याच्यामुळे कधी कोणाला जीव गमवावा लागेल हे सांगता येत नाही.एवढेच नव्हे तर वर्षानुवर्षे ठाण मांडून मधोमध असलेले विद्युतखांब सर्वाधिक अतिक्रमणांसाठी संरक्षणच ठरले आहेत. असे शेकडो विद्युतखांब ‘असून खोळंबा-नसून अडथळा’ ठरले आहेत. या खांबांच्या अडथळ्यामुळे रस्ता वापरात येत नाही.

Rate Card

 

परिणामी या खांबांसह अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विद्युत खांबांअभावी हे रस्ते पूर्ण क्षमतेने वापरात नाहीत.  जत- सांगली ,बिंळूर महामार्गा सह अनेक ठिकाणी हे चित्र आहे. यातील अनेक खांब हे विद्युतदिवे नसल्याने अंधारात असतात. त्यातून अपघातांचे सापळेच बनले आहेत. यातून हजारो अपघात झाले. शेकडोजण जखमी तर काहीजणांचे बळीही गेले. तरीही नगरपरिषद,महावितरण प्रशासनाला याचे जणू देणे-घेणेच नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.