.. येथे अनेक लॉजवर लाजलज्जा खुंटीला टांगून अनैतिक व्यवसाय बोकाळला

0
5
चंदनाची लागवड करा,भरघोस उत्पन्न मिळवा रोपासाठी वरील नंबरवर फोन करा
चंदनाची लागवड करा,भरघोस उत्पन्न मिळवा रोपासाठी वरील नंबरवर फोन करा

जत : जत तालुक्यातील अनेक लॉजवर लाजलज्जा खुंटीला टांगून अनैतिक व्यवसाय बोकाळत चालले असून, विनासायास उपलब्ध होणार्‍या या लॉजमुळे तालुक्यातील युवापिढी वाममार्गाने भरकटत चालल्याचे दिसत आहेत.जत‌ तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील अनेक लॉज बेकायदेशीर असून, केवळ अनैतिक कारणांसाठीच अशा लॉजचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा बेकायदेशीर लॉजची झाडाझडती घेण्याची गरज आहे.

 

जत शहरासह परिसर हा प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाची वाढ झाली आहे. अनेक हॉटेल्स आणि लॉज ही प्रतिष्ठित आणि नामवंत आहेत. या लॉजनी आपला लौकीक चांगलाच सांभाळला आहे. मात्र,तालुक्यात असेही काही लॉज आहेत की नैतिकतेचा आव आणत लॉजचा‌ व्यवसाय केवळ अनैतिक व्यवसायांसाठीच केला जातो आहे. अशा लॉजवर रात्रं-दिवस चोरीछुपे येणार्‍या संशयास्पद जोडप्यांचा वावर आढळून येतो. अनेकवेळा महाविद्यालयीन तरुण-तरुणी अशा लॉजवर आढळून येतात. यापैकी काही लॉज तर केवळ वेश्या व्यवसायासाठी म्हणूनच ओळखले जातात.

 

लॉजवर येणार्‍या ग्राहकांकडे ओळखपत्र असणे सक्तीचे आहे. मात्र, केवळ अनैतिक कारणांसाठीच वापरण्यात येत असलेल्या या लॉजवर ‘आव जाव घर तुम्हारा’ असा मामला आढळून येतो.गेल्या काही वर्षांत लॉजचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. यापैकी काही लॉजवर चोरीछुपे तर काही लॉजवर राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालतो, हे आजपर्यंत अनेकवेळा चव्हाट्यावर आलेले आहे. याशिवाय ‘प्रेमाचे रंग उधळण्यासाठी’ महाविद्यालयीन युवक-युवतींकडूनही अशा लॉजचा आसरा घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी सांगली एका लॉजवर पोलिसांनी धाड टाकली असता,थेट पोलीस निरिक्षक आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

 

त्याहून गंभीर बाब जत तालुक्यातील लॉजवर घडत‌ आहेत.कोरोना नंतर सुरु झालेल्या शाळा, महाविद्यालयीन अल्पवयीन प्रेमीयुगुलांपैकी लगेच लॉज उपलब्ध होत असल्याने असे प्रकार वाढले आहेत.आम्ही त्यातले नाही आहोत म्हणणाऱ्या व नैतिकतेचे धडे देणाऱ्या काही लॉज मालकांनी लॉजवर अशा पद्धतीने महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांचा वारंवार वावर आढळून येता.अनैतिक व्यवसायासाठी वापरण्यात येत असलेले अनेक लॉज हे बेकायदेशीर आहेत.नोंदणी प्रक्रिया बंद झाल्याने अनैतिक व्यवसायासाठी वापर वाढला आहे.अशाने युवा पिढीला वाममार्गाला लावण्यास हातभार लावणार्‍या अशा लॉजची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here