जतेत धाडसी चोरी, गोडावून फोडून ३० लाखाचा मुद्देमाल लंपास

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरात शनिवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली आहे, राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवारातील कृषी सेवा केंद्राचे गोडावून फोडून चोरट्यांनी तब्बल ३० लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

 

अधिक माहिती अशी, जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गा लगतच्या बाजार समितीच्या गाळ्यासमोरील साईराम कृषी सेवा केंद्राचे मार्केट यार्डातील गोडावन आहे.शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला.आतून स्वेटरचे कुलूप तोडून आतील विविध औषध कंपन्याचे ३० लाख रूपये किंमतीचे ४७ बॉक्स लंपास केल्याचे‌ समोर आले आहे.जत पोलीसांना यांची कल्पना देण्यात आली आहे.

 

पोलीसाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी झालेली चोरी पोलीसांना आवाहन ठरली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.