
जत,संकेत टाइम्स : रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी जत गटातून निवडणूक लढवत आहेत.निवडणूक अतिंम टप्यात आली असतानाच जमदाडे यांचे फेसबुकवर बनावट अंकाऊट काढून विरोधकांनी बदनामी सुरू केल्याची तक्रार जमदाडे यांनी जत पोलीसात दिली आहे.


जमदाडे म्हणाले,मी बँकेच्या निवडणूकीत ताकतीने लढत आहे.मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे,ही लढाई धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे.सत्ताधारी मंडळीना जनता वैतागली आहे.त्यामुळे मला पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकत आहे.त्यामुळे त्यांनी सत्ता, बळाचा वापर करून मला बदनाम करत निवडणूकीमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे.
फेसबुक वर कोणतीही पोस्ट अथवा असे कोणतेही फेसबुक पेज माझ्याकडून तयार केलेले नाही.या बनावट अंकाऊट बाबत जत पोलीसात मी रितसर तक्रार केली आहे. सुज्ञ मतदार व कार्यकर्त्यांनी आशा पोस्ट वर विश्वास ठेवू नये,असे आवाहनही जमदाडे यांनी केले आहे.