जत,संकेत टाइम्स : गुगावड (ता.जत) चे संरपच महादेव अंदानी यांच्याविरोधातील तक्रार अखेर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी फेटाळून लावले आहे.त्यामुळे महादेव अंदानी यांचे संरपच पद अबाधित राहिले आहे.अंदानी हे गतवेळी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झाले आहेत, ते सध्या गुगवाडचे संरपच आहेत.
दरम्यान त्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून घर व दुकान गाळे काढलेत, त्यांनी शासकीय जमिन मिळविल्याचे आरोप करत त्यांचे संरपच पद रद्द करावे,अशी तक्रार जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांच्याकडे दाखल झाली होती.त्यावर निकाल देताना जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.गुगवाड यांचे भाऊ मल्लिकार्जुन सिंदलिंग अंदानी यांची ती मालमत्ता आहे.
संरपच महादेव अंदानी हे कुंटुबियासह वेगळे जत येथे राहतात.शिवाय त्यांचे रेशनकार्ड स्वतंत्र आहे.त्यामुळे त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द होत नाही.असा निकाल देत त्यांच्या विरोधातील अपिल फेटाळले आहे.दरम्यान अंदानी यांचे पद अबाधित राहिल्याने अभिनंदन होत आहे.
तक्रारदाराचे अपिलदरम्यान अंदानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेले तक्रारदारांनी हा निकाल अमान्य करत पुणे आयुक्त कार्यालयाकडे अपिल केले आहे.