पालकमंत्री जयंत पाटील आज जतेत

0
जत,संकेत टाइम्स : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पँनेलचे प्रमुख जयंत पाटील रविवारी उशिराने जतेत आले आहेत.आज सकाळी ९.०० वाजता महाविकास आघाडीच्या पँनेलची प्रचार सभा होणार आहे.त्यानंतर मँरेथान बैठका घेत करेक्ट कार्यक्रम नियोजन पालकमंत्री पाटील यांनी केले असल्याचे त्यांच्या निकटवृत्तीयांनी सांगितले.
दरम्यान आज सोमवारी होणाऱ्या प्रचार सभेस कृषी, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम,शिवसेनेचे आमदार अनिल बाबर,आमदार विक्रमसिंह सांवत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील आज राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेस व शिवसेनेचे नेते,पदाधिकारी,मतदारांशी संवाद साधणार आहेत.काही काठावरील मतदारांना त्यांनी महाविकास आघाडीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.दरम्यान आजपासून पालकमंत्री जिल्हात असल्याने बँकेच्या निवडणूकीत करेक्ट कार्यक्रम करणार आहेत.त्यांची सुरूवात जतमधून आज होणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.