शिक्षक बँकेत आमचे‌ स्वतंत्र पँनेल, या नेत्यांने केली घोषणा

0
जत,संकेत टाइम्स : येऊ घातलेल्या‌ शिक्षक बँकेच्या निवडणूकीत मागासवर्गीय संघटना ताकतीने उतरणार असून सभासदाच्या हितासाठी काम करणाऱ्या समविचारी संघटनेबरोबर एकत्र लढण्याचा आमचा विचार आहे,मात्र तसे घडले नाही तर प्रंसगी स्वतंत्र पँनेल उभे करू,अशी भूमिका संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी यांनी व्यक्त केली.

 

शिक्षक बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक कवटेमहांकाळ येथे संपन्न झाली.
यावेळी सर्व तालुक्यातील ‌प्रतिनिधी,जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षक बँकेची निवडणूक पुर्ण ताकतीने लढण्याचा एक मताने निर्णय झाला.समविचारी संघटनेकडून प्रस्ताव आल्यास एकत्रित लढू अन्यथा स्वतंत्र पँनेल उभे करण्याचा यावेळी निर्णय झाला.

 

हिंदुस्तानी म्हणाले,जिल्ह्यातील शिक्षक,सभासदाची पिळवणूक करत आलटून पाटून सत्ता उपभोगणाऱ्या सत्ता पिपासू लोकांच्या विरोधात आमचा लढा आहे.सभासदाचे हित पाहण्यापेक्षा आपले खिसे भरण्याचा उद्योग बँकेत गेल्या दशकापासून  सुरू आहे.या प्रकाराला पायबंध घालण्याची वेळ आली आहे. आम्हाला सभासदाचा मोठा पांठिबा मिळत आहे.

 

Rate Card
जिल्हाध्यक्ष शिवाजी वाघमारे म्हणाले,शिक्षक बँकेत आम्ही निवडणूक लढविणार आहोत.आमच्याशी समविचारी संघटनेचा प्रस्ताव आल्यास एकत्रित निवडणूक लढून सत्ता परिवर्तन करण्यासाठी ताकतीने लढू.सभासद हित,त्यांच्या पैशाची बचत,व्याज कमी करण्याबरोबर बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे.

सरचिटणीस विजयकुमार कुरणे,जिल्हा संघटक दिलीप कांबळे,कवटेमहांकाळ तालुकाध्यक्ष संजय साबळे,जत तालुकाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, सरचिटणीस शांतीलाल साळुंखे,किशोर भंडारे,नरेंद्र खांडेकर,मिरज तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे,रवी वाघमारे, दिलीप वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कवटेमहांकाळ शिक्षक बँकेच्या निवडणूकीत ताकतीने लढण्याचा निर्धार करताना संघटनेचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.