सांगली : राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार सांगली जिल्ह्यातील पोटनिवडणूक असलेल्या 116 ग्रामपंचायतीतील 160 रिक्त पदांकरीता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दि. 21 डिसेंबर 2021 रोजी तर मतमोजणी दि. 22 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही, असे सदर कार्यक्रमामध्ये नमूद केले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आचारसंहितेबाबतचे दि. 14 ऑक्टोबर 2016 चे एकत्रित आदेश, दि. 6 सप्टेंबर 2017 चे अतिरिक्त आदेश व दि. 17 डिसेंबर 2020 च्या पत्रामधील सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही, असे नमूद केले आहे.
ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक – 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) पर्यंत, तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दि. 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) ते दि. 6 डिसेंबर 2021 (सोमवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3, नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ -दि. 7 डिसेंबर 2021 (मंगळवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक व वेळ – दि. 9 डिसेंबर 2021 (गुरूवार) दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – 9 डिसेंबर 2021 (गुरूवार) दुपारी 3 वाजल्यानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – 21 डिसेंबर 2021 (मंगळवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 22 डिसेंबर 2021 (बुधवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – 27 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत.
तालुकानिहाय रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीतील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे.
आटपाडी – औटेवाडी-03, घाणंद-1, जांभूळणी-1, पात्रेवाडी-2, वाक्षेवाडी-1, दिघंची-1, घरनिकी-1, करगणी-1, झरे-1.
कडेगाव – रेणुशेवाडी – 2, हिंगंगावबु-2, उपाळे वांगी-1, तुपेवाडी ये-1, वाजेगाव-1, उपाळे मायणी-3, रायगाव-1, शाळगाव-1, विहापूर-1.
कवठेमहांकाळ – विठूरायाचीवाडी-1, रामपूरवाडी-1, बोरगाव-1, दुधेभावी-1, कोंगनोळी-1, तिसंगी-1, अ.धुळगाव-1.
पलूस – पुणदीवाडी-2, पुणदी वा-1, हजारवाडी-1, बांबवडे-2, मोराळे-1, नागठाणे-1, घोगाव-1, सुखवाडी-1.
मिरज – इनामधामणी-1, कांचनपूर-2, काकडवाडी-1, मानमोडी-1, डोंगरवाडी-2, पाटगाव-1, सांबरवाडी-2, गुडेवाडी-2, रसुलवाडी-1, खंडेराजुरी-5, समडोळी-1.
तासगाव – ढवळी-1, विजयनगर-2, धोंडेवाडी-2, कुमठे-1, योगेवाडी-1, पानमळेवाडी-1, किंदरवाडी-2, नागांव नि.-3, गौरगाव-1, कचरेवाडी-1.
वाळवा – नवेखेड-1, डोंगरवाडी-2, नायकलवाडी-1, भवानीनगर-1, कापूसखेड-1, चिकुर्डे-1, भरतवाडी-2, फार्णेवाडी बी-2, बेरडमाची-1, पडवळवाडी-1, जक्राईवाडी-2, तांदुळवाडी-1, कारंदवाडी-1, कुरळप-1, मालेवाडी-1, कामेरी-1.
जत - वाळेखिंडी-1, अंकलगी-1, माडग्याळ-1, मोटेवाडी-1, बोगी खु-1, उटवाडी-1, गुलगुंजनाळ-1, गुगवाड-1, सोन्याळ-1.
शिराळा – बेलेवाडी-2, चिखलवाडी-1, चिंचेवाडी-1, खराळे-3, मानेवाडी-2, भैरववाडी-2, शिवरवाडी-1, धसवाडी-2, ढोलेवाडी-2, कदमवाडी-2, खुंदलापूर-1, वाकाईवाडी-2, पाचगणी-1, मोरेवाडी-2, अस्वलेवाडी-2, शिंदेवाडी-2, मराठेवाडी-2, वाकुर्डे बुद्रुक-1, चिंचोली-1, माळेवाडी-1, शेडगेवाडी-1, औंधी-2, खेड-1, मोरेवाडी-1.
खानापूर – गार्डी-1, कळंबी-1, जाधवनगर-2, रामनगर-2, धोंडगेवाडी-1, धोंडेवाडी-2, देवनगर-1, सांगोले-1, घोटी बु-1, हिवरे-1, वासुंबे-1, साळशिंगे-1, बाणूरगड-1, भूड-1.