ढालगावचे स्वराज्य कलेक्शन नव्या‌ दांपत्याला घडविणार गोवा सफर

0
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन असलेल्या व अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या ढालगांव येथील स्वराज कलेक्शनमध्ये नव्या दांपत्याला गोवा सफरची भेट देणार असून लग्नाचा बस्ता काढणाऱ्या दांपत्यास ही ऑफर ठेवण्यात आली असल्याची माहिती मालक अजितराव खराडे यांनी दिली.

 

 

दसरा,दिवाळीला ग्राहकांना तूफान लाभ मिळवून दिलेल्या‌ स्वराज्य कलेक्शन कडून या नव्या ऑफर योजनेचे सर्वत्र स्वागत होत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे ढालेवाडी रस्त्यालगत वीज बोर्डाजवळ माजी सैनिक अजितराव खराडे यांनी स्वराज कलेक्शन नावाने कपडे खरेदीचे सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट जागेत सुसज्ज व आधुनिक वस्त्रदालन उभारले आहे.

 

अवघ्या पाच वर्षात हाजारो चोखदळ ग्राहकांच्या विश्वसाची परंपरा येथे‌ जोपासली आहे.सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ,जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

 

खास लग्न बस्त्याची सोय,नवरदेव व वराला गोवा ट्रीप,नवरीसाठी स्वतंत्र दालन, गुणवत्तेची हमी व माफक दर, हाजारो व्हरायटी,सर्व नवीन स्टॉक,३६५ दिवस डिस्काऊंट व सर्व ब्रडेंड कंपन्याचे कपडे एकाच छताखाली व विनम्र सेवा तसेच ग्राहकांचे समाधान हाच नफा,यामुळे कपडे खरेदी साठी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

 

माजी सैनिक अजितराव खराडे यांच्या कल्पकतेमुळे स्वराज कलेक्शनचे नाव सर्वत्र परिचित झाले आहे. सामाजिक बांधिलकी जपत व्यवसायाची प्रगती होत आहे.जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील गावां गावांत नांव झाले आहे.दसरा दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर खास ऑफर ठेवण्यात आली होती.

 

आता लग्न सराई सुरू झाली आहे.त्यामुळे लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर स्वराज कलेक्शनमध्ये लग्नाचा बस्ता काढल्यास नवरा व नवरीसाठी खास गोवा ट्रीपची खास ऑफर ठेवण्यात आली आहे. नवरा नवरीसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. ग्राहकांनी गोवा ट्रीपच्या खास ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन स्वराज कलेक्शनचे प्रोप्रायटर अजितराव खराडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.