सांगली : सांगली शहरात भरवस्तीत कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीस सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डि.एस.हातरोटे यांनी सुनावली. स्मिता बापुसो पाटील,(वय-४५, रा. धामणी रोड, स्फुर्ती चौक, सांगली) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.भारतीय दंड संहिता कलम ३७० व अनैतिक मानवी वाहतूक कायदा कलम ४,५ अन्वये दोषी धरुन सात वर्षे सक्तमजूरीची शिक्षा व रकम रुपये दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली. याकामी सरकारपक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकिल श्रीमती व्ही.के. मुरचिटे यानी काम पाहिले.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी स्मिता पाटील ही सांगली येथील स्फुर्ती चौक, विश्रामबाग सारख्या गजबजलेल्या य उच्चर्भ्रू लोकांच्या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुटनखाना चालवित असे,यासाठी सदर आरोपी ही गरीब गरजू व अज्ञान मुलींना पैशाचे आमिष दाखवून तसेच त्यांच्या गरीबी आर्थिक परिस्थितीचा गैरलाभ घेवून वेश्या व्यवसाय करावयास भाग पाडत होती.अशा मुलींच्या कडून वेश्या व्यवसाय करवून घेतून त्याचे उत्पन्नावर ती स्वत:ची उपजिवीका चालवित होती.
सदरची ‘माहिती विनामाबाग पोलीस स्टेशन येथील पोलिस अधिकाऱ्यांना समजून आल्यानंतर त्यांनी आरोपी स्मिता पाटील हिच्या घरी दिनांक २८ संप्टेबर २०१९ रोजी बोगस गिऱ्हाईक व पंच घेवून रितसर छापा टाकला असता, आरोपी स्मिता पाटील अज्ञान मुलींच्या मार्फत वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाले व पोलिसांनी आरोपीस रंगेहाथ घटनास्थळीच अटक केली. विश्रामबाग पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक ए.एच.तगपुरे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला.
सदर कलमांखाली सांगली येथील सत्र न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला. या चौकशीचे कामी सरकारपक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.या साक्षीदारांपैकी पिडीत,पंच व बोगस गिऱ्हाईक या साक्षीदारांची साक्ष सत्य वस्तुस्थिती निदर्शक झाल्याने त्यांच्या अमुल्य साक्षीमुळे कोर्टाने आरोपीस वरीलप्रमाणे सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याकामी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अंमलदार इम्रान महालकरी व पैरवी कक्षातील वंदना मिसाळ व सर्व अंमलदार याचे सहकार्य लाभले.