जत : जत तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव खालावल्याने अलर्ट असलेल्या आरोग्य यंत्रणेला मरगळ आली आहे.त्यामुळे रुग्णांना त्रासाला सामोरे जाल लागत आहे.
पुन्हा आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेविका,सेवक,कर्मचाऱ्यांची दांडी यामुळे केंद्रे,निवासस्थाने धुळखात पडली आहेत. दुष्काळ पाचवीला पुजलेल्या जत तालूक्यातील जनतेच्या आरोग्याचा उपचाराचाही कृत्रीम दुष्काळ आहे.जत तालुक्यातील गरीब नागरिकांना वेळेवर उपचार व्हावे यासाठी राज्य शासनाने ग्रामीण भागातसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रे याच्या शाखाची निर्मिती केली आहे.
उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू असून, त्यातच आरोग्य सेविका, परिचारिका तसेच परिचर चौकीदार यांनी शासनामार्फत आरोग्य केंद्रातच व मुख्यालयी राहण्याचे आदेश असून, देखील या नियमाची पायमल्ली केली जात आहे.ग्रामीण भागातील गरीब श्रमजिवी जनता या हलगर्जी धोरणाला कंटाळून वेळेवर उपचार होत नसल्या कारणाने रोष व्यक्त केल्या जात आहे.
संख,कोतेबोबंलाद,माडग्याळ,उमदी, येळवी, शेगाव,बिंळूर,जत,डफळापूर,वंळसग ‘या ठिकाणच्या आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात.’यातील प्रत्येक केंद्रा अंतर्गत पाच- सहा उपकेंद्र असतात. काही केंद्रात कर्मचारी मुक्कामी राहत आहेत.मोठय़ा ग्रामीण खेड्यामध्ये देखील मनुष्यबळाचा वापर कमी आहे. त्यामध्ये डॉक्टर हे वेळेवर उपस्थित राहत नाही, राहिलेच तर आपल्या वेळेवर पाहिजे ते कामे करून शहरी भागाकडे निघून जातात.
तेथे आपले खाजगी दवाखाने चालवित आहेत. या सर्व प्रकाराचा मन:स्ताप मात्र ग्रामीण जनतेला सहन करावा लागतो. वरिष्ठ अधिकारीही या प्रकाराकडे कायम दुर्लक्ष करतात. रात्री-बेरात्री उपचारच मिळत नाही काही वैधकीय अधिकारी स्थानिक लोकाना हाताशी धरून नागरिकावरच अरेरावी करत असल्याचे अनेक रुग्ण सांगतात.