उमराणीतील सराईत चोरट्यास तासगाव पोलीसांनी केले जेरबंद

0
तासगाव : तासगाव तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या चोरीतील चोरट्यास तासगाव पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे.विशाल संभाजी पवार (वय २३, रा.मुळगांव उमराणी ता.जत जि.सांगली, सध्या रा.शिवशक्ती कॉलनी जयसिंगपुर जि.कोल्हापुर)असे संशयित चोरट्याचे नाव आहे.
नुकतीच येळावी ता.तासगांव येथील हॉटेल फ्रेंड्स चे शटर उघडून आत मध्ये प्रवेश कँश काउंटरमधील रोख रक्कम व दारुच्या वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या असा एकूण १८,००० रु किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

 

 

तासगांव डीबी पथकातील सागर लवटे,सोमनाथ गुंडे यांना सांगली जिल्ह्यातील घरफोडीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा तासगांव येथे‌ येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली त्याअनुशंगाने पेट्रालिंग करीत असताना पुणदी रोड तासगांव येथे
बातमीच्या अनुशंगाने एक इसम संशयित रित्या सॅक घेवुन फिरत असताना मिळून आला.

 

 

त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाय
गांय विचारले असता त्याने त्याचे नांव विशाल पवार,गाव उमराणी ता.जत असल्याचे सांगितले.हा इसम सांगली जिल्हात रेकॉर्डवरील आरोपी असल्यामुळे व तो उडया-उडवीची उत्तरे देवू लागल्यामुळे त्यास चौकशी कामी तासगांव पोलीस ठाणेत आणुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे सॅकमध्ये एक लॅपटॉप,एक लोखंडी पाना,दोन मोबाईल व रोख रक्कम मिळून आली.

 

सदर आरोपीकडे तासगांव तालुक्यातील होत
असलेल्या घरफोडीच्या गुन्हयांच्या अनुशंगाने चौकशी केली असता गेले दोन महिन्यापुर्वी येळावी येथील हॉटेल फ्रेंड्स हे फोडुन तेथुन रोख रक्कम व दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या असल्याचे सांगितले तसेच त्याने गेले दीड वर्षापासुन तासगांव,कडेगांव,आटपाडी,मिरज या भागातील कृषी सेवा केंद्रे व किराण मालाची दुकाने फोडुन त्यातुन रोख रक्कम चोरली असल्याची कबुली दिली आहे.

 

 

घडलेल्या गुन्ह्यांच्या अनुशंगाने कडेगांव,आटपाडी,मिरज,सांगली या भागात १३ गुन्हे केल्याची यातील आरोपीने कबुली देवुन वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला व चोरीच्या पैशातुन खरेदी केलेला १०,००० रुपेयचा लिनोओ कंपनीचा लॅपटॉप,२०,०००रूपयेचा विवो कंपनीचा मोबाईल,१,००० रूपये किंमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल,३० रुपेयाचा एक लोखंडी नटबोल्ट खोलायचा पाना,१२,००० रूपये रोख रक्कम असा एकूण ४३,०३० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.

 

 

संशयित हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो रात्रीच्या वेळी कृषी सेवा केंद्रे,किराणमाल दुकान,पानपट्टी हे नटबोल्ट खोलायच्या पान्याच्या सहाय्याने दुकानाचे पाठीमागील बाजूचा पत्रा किंवा वरील बाजुचा पत्र्याचे नटबोल्ट काढुन पत्रा फोडुन अशा प्रकारे चोरी करुन त्यातुन मिळणारी रोख रक्कम स्वतहाचे उदनिर्वाह व चैनीसाठी वापर करत असतो.संशयित हा फिरस्ता असुन तो वारंवार स्व:ताचे राहण्याचे ठिकाणच असतो.आरोपीविरुद्ध सांगोला,जत,कवठेमहांकाळ,मिरज पोलीस ठाणे येथे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत.
तासगाव पोलीसांनी मुद्देमालासह पकडलेला उमराणीतील चोरटा
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.