अवकाळीने द्राक्ष घड कुजण्याची भिती | बागायतदार चिंतेत

0

जत : दोन वर्षाच्या लॉकडाउन आणि गुलाब गारपीठाने पावणे जवळपास हाजारो हेक्टरवरील दणक्यातून शेतकरी सावरत नाही तोच, ऐन द्राक्ष फळ पक्व होण्या अगोदरच गत चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पाणी फिरविले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारीपासून सुरू झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान केले.तालुका भरातील द्राक्ष, भाजीपाल्याच्या नगदी पिकांना  पावसाचा फटका बसला आहे.

 

Rate Card
द्राक्षाची ऐन फळे बाहेर पडण्याच्या स्थिती पावस होत असल्याने फळे कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे.याशिवाय टोमॅटो, मिरची, काकडी, फ्लॉवर सह पालेभाज्या पिकविणारी शेतकरी तालुक्यात आहेत.गत वर्षात झालेला चांगला पाऊस,म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी यामुळे कधी नव्हे इतकी शेती जत तालुक्यात बहरली आहे.

 

 

 

पिकेही जोमदार आहेत.समाधान असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसत आहे.हवामान विभागाने अजून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.