गुड्डापूर धानम्मादेवी यात्रा | सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करा ; आ.विक्रमसिंह सांवत

0
माडग्याळ, संकेत टाइम्स : गुडडापूर (ता.जत) येथील श्री दानम्मा देवी यात्रेनिमित्त प्रशासन व देवस्थान कमिटी यांच्या समन्वय व आढावा बैठक संपन्न झाली.बैठकीत यात्रेनिमित्त मार्गदर्शक सूचना करण्यात आले.यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,जि.प सदस्य सरदार पाटील, प्रांतअधिकारी जोगेंद्र कट्यार, तहसीलदार जीवन बनसोडे, संखचे अप्परतहसीलदार एस आर मागाडे ,डीवायएसपी रत्नाकर नवले पोलिस निरीक्षक ऊध्दव डुबल  ,ट्रस्ट चेअरमन सिद्धया स्वामी,सेक्रेटरी विठ्ठल पुजारी, सरपंच,संचालक व बांधकाम विभाग,वीजवीतरण विभाग ,आरोग्य सहित इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

गुड्डापुर येथील धानम्मा देवीची यात्रा कोरोना संकटामुळे दोन वर्ष झाली नाही परंतु कोरूना चे नियम शितील झाल्याने गुड्डापुर येथील धानम्मा देवी ट्रस्टच्यावतीने कोरणा संबंधित प्रशासनाने घातलेल्या सर्व नियम व अटी पाळून यात्रा भरणार असल्याचे सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांत व तहसीलदार म्हणाले,देवस्थान ट्रस्टने तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आव्हान केले.अजून कोरोनाचे संकट गेले नसून गर्दी करू नये.

 

 

 

पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवणे. विजेचे संकट येऊ नये म्हणून जनरेटर सोय ठेवणे ,स्टाफचे गैरसोय होऊ नये याची काळजी घेणे,अग्निशामक दल उपस्थित ठेवणे, दारू विक्री,गुठखा विक्री होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनने काळजी घेणे ,भेसळ होऊ नये म्हणून दक्षता घेणे,प्रसाद व नारळ फोडणेला बंदी आहे,गटागटाने दर्शनासाठी सोडणे ,ठीक ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करणे,गटारी स्वच्छ करणे,देवस्थान परिसर निर्जंतुक करणे, अतिक्रमण काढणे,स्वच्छता करणे,शेजारील गावातील अतिक्रमण काढावेत,मास्क नसेल तर सोडायच नसून मास्क स्टॉल लावावेत. सॅनिटायझर उपलब्ध करणे अशा विविध सूचना दिल्या.

 

 

 

आ.विक्रमसिंह म्हणाले,यात्रेला भाविक कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून चालत व चारचाकी गाडीने येत असतात त्यामुळे रस्त्याकडेला झाड झुडपे वाढले असून ते काढावेत, रस्त्यावरती खड्डे भरून घ्यावेत,आरोग्य विभागाने चांगली सेवा द्यावी,महावितरणने कोठेही शॉर्ट सर्किटने होऊ नये याची काळजी घेण्याचे आव्हान केले.कर्नाटकमधून येणारी बसेसची  तोडफोड होणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान केले.

 

 

वयाची 60 वर्षे वरील व्यक्ती व 10 वर्षे खालील मुलांना घरीच थांबण्याचे आव्हान प्रांताधिकारी यांनी केले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी म्हणाले,प्रशासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करून यात्रा सुरळीत पार पाडू व प्रशासनाला सहकार्य करण्यार असल्याचे सांगितले.

 

 

 

पोलीसाकडून होणारी लूट थांबवा ; आ.सावंत
कर्नाटक मधून येणाऱ्या खासगी वाहनाला आडवणूक होत असते असे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निदर्शनास आणून दिले तर खाजगी वाहने अडवून पैसे घेऊन नाहक त्रास देतात असे पत्रकाराने पोलीस अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले,असे काही घडत असल्यास कळवण्याचे आव्हान डी वाय एस पी रत्नाकर नवले यांनी केले.

 

गुडडापुर यात्रेनिमित्त आढावा बैठकीत बोलताना आ.विक्रमसिंह सावंत, प्रांताधिकारी ,तहसीलदार,डी वाय एस पी व इतर .
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.