इंगवले पुढे म्हणाले की,फॅबटेक मल्टीस्टेट च्या सोलापूर जिल्ह्यात 9 शाखा असून उमदी ही 10 वी शाखा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, सांगली जिल्ह्यात आटपाडी,जत तसेच पुणे येथे व कर्नाटक राज्यात धुळखेड येथे नविन शाखा विस्तार लवकरच करणार आहोत.
उमदीचे तंटामुक्त अध्यक्ष निवृत्ती शिंदे म्हणाले, फॅबटेक मल्टीस्टेट ही आपणा सारख्या ठेवीदार कर्जदार व सभासद खातेदार यांनी ठेवलेल्या विश्वासावर तसेच कर्मचा-यांनी निष्ठेने केलेल्या कामावर उभी आहे.
आगामी काळात महाराष्ट्र राज्यात फॅबटेक मल्टीस्टेट या सोसायटीला अग्रेसर आणण्याची जबाबदारी आपली आहे.यावेळी उपसरपंच रमेश हळके,संगप्पा माळी,बंडु शेवाळे, पोलीस निरीक्षक पंकज पवार, आप्पा कुंभारे, डाँ.लोणी, डॉ.पाटील, डॉ.म्हेत्रे, डॉ.हत्तळी, महादेव जाधव सर, श्री.मलकारसिध्द देवस्थानचे पुजारी, नारायण ऐवळे, बाळासाहेब शिंदे, महेश आसबे, बाबु सावंत,संतोष अरकेरी,गोविंद शेवाळे, शिवाजी पडवळे,भरमु खांडेकर,शिवसेना शाखा प्रमुख बिराप्पा ढाणे,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिपक बंदरे यांनी आभार मानले.
फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि,सांगोला या सोसायटीच्या उमदी शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.