फॅबटेक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या उमदी शाखेचे‌ उद्घाटन

0
उमदी,संकेत टाइम्स : फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि,सांगोला या सोसायटीचे उमदी (ता.जत) येथे 10 व्या शाखेचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत करुन सोसायटीचे वाटचाली बाबत माहिती सांगून मार्गदर्शन केले.

 

 

 

व्हा.चेअरमन अनिल इंगवले म्हणाले, फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक मल्टीस्टेट आज अखेर 5 वर्षे यशश्वीरित्या आपल्या सारख्या सभासद / ठेवीदार / कर्जदार यांनी ठेवलेल्या अभूतपूर्व विश्वासाने पूर्ण झालेली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या व्यवसाय वाढीसाठी व तळागाळातील लोकापर्यंत बँकिंग सेवा पुरवून मुख्य प्रवाहात आणण्याचे व्रत हाती घेतलेले आहे.

Rate Card

 

 

 

इंगवले पुढे म्हणाले की,फॅबटेक मल्टीस्टेट च्या सोलापूर जिल्ह्यात 9 शाखा असून उमदी ही 10 वी शाखा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, सांगली जिल्ह्यात आटपाडी,जत तसेच पुणे येथे व कर्नाटक राज्यात धुळखेड येथे नविन शाखा विस्तार लवकरच करणार आहोत.
उमदीचे तंटामुक्त अध्यक्ष निवृत्ती शिंदे म्हणाले, फॅबटेक मल्टीस्टेट ही आपणा सारख्या ठेवीदार कर्जदार व सभासद खातेदार यांनी ठेवलेल्या विश्वासावर तसेच कर्मचा-यांनी निष्ठेने केलेल्या कामावर उभी आहे.

 

 

 

आगामी काळात महाराष्ट्र राज्यात फॅबटेक मल्टीस्टेट या सोसायटीला अग्रेसर आणण्याची जबाबदारी आपली आहे.यावेळी उपसरपंच रमेश हळके,संगप्पा माळी,बंडु शेवाळे, पोलीस निरीक्षक पंकज पवार, आप्पा कुंभारे, डाँ.लोणी, डॉ.पाटील, डॉ.म्हेत्रे, डॉ.हत्तळी, महादेव जाधव सर, श्री.मलकारसिध्द देवस्थानचे पुजारी, नारायण ऐवळे, बाळासाहेब शिंदे, महेश आसबे, बाबु सावंत,संतोष अरकेरी,गोविंद शेवाळे, शिवाजी पडवळे,भरमु खांडेकर,शिवसेना शाखा प्रमुख बिराप्पा ढाणे,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिपक बंदरे यांनी आभार मानले.
फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि,सांगोला या सोसायटीच्या उमदी शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.