नूतन कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात करियर कट्टा ठरणार विद्यार्थ्यांसाठी वरदान

0
कवटेमहांकाळ : राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नूतन कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय कवठेमंकाळ येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सुविधा केंद्र यांच्या वतीने आयोजित करिअर कट्टाची स्थापना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Rate Card

 

 

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिशय नाममात्र शुल्कामध्ये एक रुपया रोजच्या प्रमाणे आयएएस आपल्या व उद्योजक आपल्या भेटीला हे अतिशय लोकप्रिय असे उपक्रम कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्यांना फक्त वार्षिक रुपये 365 मध्ये 400 तासाचा ऑनलाइन खड आपल्या भेटीला हा उपक्रम चालू केला आहे.

 

 

ग्रामीण होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जातात. एकदा करियर कट्टामध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केली की त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक रोजगाराभिमुख, कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असणारे विविध कोर्स मोफत ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.

 

 

कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य देखील या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमोल पाटील व  समन्वयक प्रा. मनोहर केंगार यांनी केले आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन माळी व संस्थेचे सचिव डॉ. रामलिंग माळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.