महादेव जानकर याच्यावर टिका करून प्रविण दरेकर यांनी ते किती विकृत्त आहेत,हे दाखवून दिले ; अजित पाटील

0
प्रविण दरेकर किती विकृत्त आहेत,हे त्यांनी दाखवून दिले ; अजित पाटी
मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमचे महादेव जानकर यांच्यासंदर्भात जे टीकात्मक वक्तव्य केले आहे. त्याचा राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. दरेकर हे किती विकृत आहेत, हेच त्यांच्या विधानावरून दिसत आहे.

 

 

 

अशी टिका राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील यांनी केली आहे.
जानकर यांनी एसटी विलीनीकरणाची वस्तुस्थिती सांगून, लोकांनी शहाणे व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे दरेकरांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.एसटी कर्मचाऱ्यांना भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजायची, हा एजेंडा भाजपचा आहे.कोरोना काळात सर्वजण संकटात असताना शांततेच्या मार्गाने मार्ग काढायचे सोडून दंगली घडविण्याची कारस्थाने भाजपकडून रचली जात आहेत, हेही आता उघड झालेले आहे.

 

 

एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असताना, भाजपकडून एसटी कर्मचाऱ्यांची ढाल करून महाराष्ट्रातील जनतेची कोंडी केली जात आहे. यातून विस्फोटक परिस्थिती भाजपला निर्माण करायची आहे. भाजपच्या विकृत नेत्यांनी फुगवलेला फुगा जानकर साहेबांच्या एका स्टेंटमुळे फुटला आहे. जानकर साहेबांनी सत्य सांगितल्याने जनतेच्या आकलनात नक्कीच भर पडली आहे.परिणामी भाजपचे पितळ उघ़डे पडले आहे.
जानकर साहेबांना पत्रकारांनी एसटी आंदोलनासंदर्भात प्रतिक्रया विचारली होती.

 

 

 

त्यावर जानकर साहेबांनी, आमच्या सत्तेच्या काळात विलीनीकरणाचा प्रश्न आला होता, मात्र आमचे सरकार सोडवू शकले नव्हते. रस्त्यावरची भाषा एक असते आणि सरकारमध्ये सिस्टिमने काम चालते, जनतेने शहाणे व्हावे, एवढेच सांगितले होते. त्यामुळे दरेकर आणि कंपनीचा तीळपापड व्हायची गरज नव्हती.मात्र जानकर साहेबांच्या विधानामुळे भाजपचा दुतोंडीपणा समोर आल्याने दरेकर यांचे पित्त खवळले आहे.

 

 

 

Rate Card
दुसरा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानाचा. देवेंद्र फडणवीस हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा सांगत आहेत, त्याप्रमाणे निर्णय करावा, असे दरेकर सांगत आहेत. फडणवीस सरकारमध्ये परिवहन खाते हे शिवसेनेकडे होते, त्यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव आणायला पाहिजे होता,असे सांगून दरेकर जबाबदारी झटकून टाकत आहेत.

 

 

 

फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व विभागांचे श्रेय स्वतः घेतले, हे सर्वज्ञात आहे. जलसंधारण विभागात पंकजाताई मुंडे यांनी चांगले काम करूनही तो प्रोजेक्ट स्वतःचा असल्याचे फडणवीस सांगत होते. पंकजाताईंचे यश त्यांना बघवले नाही, म्हणून शेवटी पंकजाताईंचे खाते फडणवीसांनी काढून घेतेले, हा इतिहास संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने विलीनीकरण झाले नाही,  असे म्हणणे म्हणजे शुद्ध फसवेगिरी आहे. दरेकर हेच जनतेला मुर्खात काढत आहेत.

 

 

फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना ते विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकत होते तर त्यांनी कां घेतला नाही. फडणवीस हे परिवहनच्या सचिवांना तसा प्रस्ताव आणण्याचा आदेश देऊ शकत होते, मग त्यांनी कां दिला नाही?  त्यावेळी फडणवीसांचे तोंड दरेकरांनी दाबून टाकले होते काय, असा प्रश्न पडतो.

 

 

जानकरसाहेब सांगत आहेत, ते १०० टक्के खरे आहे.फडणवीस सरकारच्या काळात हा विषय आला होता. त्यावर तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर भाष्य केले होते. ब्रम्हदेव आला तरी एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्याचे व्हि़डीओ सद्याही फिरत आहेत. तो विषय सर्वांसमोर आल्यानेच मुनगंटीवर बोलले होते. त्यामुळे दरेकरांचा खोटेपणा शंभर टक्के उघडा पडला आहे.

 

 

मुनगंटीवार म्हणतात, ब्रम्हदेव आलातरी विलीनीकरण शक्य नाही, मग आता फडणवीस कसे तोडगा सुचवत आहेत. ते आता ब्रह्मदेवापेक्षा मोठ्या पदाला पोचहचले आहेत का, याचे उत्तर दरेकर यांनी द्यावे,असे‌ आवाहनही अजित पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.