राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरिक्षण करावे,या नेत्याने केले आवाहन

0
जत,संकेत टाइम्स : महाविकास आघाडीतील कॉग्रेस आघाडी धर्म पाळेल इतर सर्व घटक पक्षांनी प्रामाणिक पणाने आघाडी धर्म पाळण्याची गरज आहे.तरचं महाविकास आघाडी मजबूत राहिल.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत झालेला पराभव मान्य केला आहे. या अपयशाला खचून न जाता पुढील सर्व निवडणूका ताकतीने लढू अशी माहिती आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 

 

जिल्हा बँकेच्या निकालानंतर आमदार  सांवत यांनी बुधवारी पत्रकार बैठक घेतली.सांवत पुढे म्हणाले,गत पाच वर्षात मी बँकेत तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा,त्याच्या अडीअडचणी सोडविण्याची प्रयत्न केला.कर्मचाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी बदल्या केल्या.विलासराव जगताप यांनी त्यांच्या काळात वर्षात सोळा वेळा बदल्या केल्या आहेत.

 

 

 

आ.सावंत म्हणाले,प्रकाश जमदाडे हे जिकडे सत्ता तिकडे ते पळतात.सुनिलबापू चव्हाण यांचे बोट धरून राजकारणात आलेले जमदाडे यांनी सातत्याने सत्ता असणाऱ्या पक्षात प्रवेश केले.माजी आमदार विलासराव जगताप यांनी आयात केलेला उमेदवार घेऊन निवडणूक लढविली.त्यांनी आत्मपरिक्षण करावे.तालुक्यातील शेतकरी,जनता माझ्या सोबत आहे.

 

 

जगताप यांची पंचायत समितीत सत्ता आहे,त्याचे चिरजिंव सभापती आहेत,मात्र गेल्या वर्षभरात कोरोनासारख्या महामारीतही ते गायब होते.आताही जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहेत.त्यांनी आमदार असताना त्यांनी निधी आणता आला नाही.त्यापेक्षा जादा निधी मी आणला आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरिक्षण करावे
आमची एकही मत फुटलेले नाही.
महाविकास आघाडी म्हणून लढताना कोणी आघाडीचा धर्म न पाळता मला व आघाडीचे पतसंस्था गटातील उमेदवार किरण लाड यांचा पराभव करण्यात कोणी फित्तूरी केली,यांच्या मागचे सूत्रधार कोन आहेत हे जाहीर आहे.यांचे आत्मपरिक्षण राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करावे,असे आवाहनही आ.सांवत यानी केले.
आमदार फोटो वापरा
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.