जत,संकेत टाइम्स : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हलगीनाद आंदोलनाची दखल घेत संख ता.जत येथील पोलीस चौकीमध्ये अखेर एक उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारी,दोन पोलीस नाईक,एका कॉस्टेबलची नेमणूक करण्यात आली आहे.तसे पत्र उमदीचे सा.पो.नि.पंकज पवार यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
उमदी पोलीस ठाण्यापासून संखचे अंतर मोठे आहे.त्याशिवाय संखच्या पुढील गावातही एकाद्या गंभीर घटना घडल्यातर पोलीसांना पोहचण्यात वेळ जातो.त्याशिवाय संख येथे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने गावगुंडाचा सामान्य जनतेला उपद्रव वाढला आहे. अवैध धंदेही बळाविले आहे.त्यामुळे संख चौकीला कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी नेमावेत या मागणीसाठी स्वा.शेतकरी संघटनेचे विठ्ठल कुंभार,भिमाशंकर बिराजदार,मल्लिकार्जुन बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली संख येथे बुधवारी हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
यांची अखेर सा.पो.नि.पंकज पवार यांनी दखल घेत एक पोलीस उपनिरिक्षक,दोन पोलीस नाईक,एक पोलीस कॉस्टेबलची नेमणूक केली.ते दिवसभर या चौकीत उपस्थित राहतील.गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे येथे दाखल करून घेण्यात येतील.सीसीटीएनएस प्रणाली पोलीस ठाणे स्तरावर असल्याने ऑनलाइन सर्व कामे उमदी पोलीस ठाण्यात होतील असे लेखी पत्र आंदोलकांना सा.पो.नि.पवार यांच्याहस्ते देण्यात आले.
त्याशिवाय कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन पवार यांनी दिले.दरम्यान चौकीला कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी नेमल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
गावगुंडाच्या दहशतीला आळा बसेलसंख येथे पोलीस चौकी होती मात्र येथे अधिकारी व कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने संखसह परिसरातील गावगुंडाचा उपद्रव वाढला होता.सामान्य जनता यामुळे दहशतीखाली होती.किरकोळ गुन्हे दाखल करण्यासाठी सुध्दा उमदी येथे जावे लागत होते.त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुंटुबियांना धोका असायचा,आता अधिकारी व कर्मचारी नेमल्याने अवैध धंदे चालकासह गावगुंडाच्या दहशतीला आळा बसेल.नागरिकांना संरक्षण मिळेल.तात्काळ कारवाई केल्याने आम्ही सा.पो.नि.पंकज पवार यांचे आभारी आहोत.भिमाशंकर बिराजदारस्वा.शेतकरी संघटनेचे नेते
संख ता.जत येथील पोलिस चौकीत कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी नेमल्याचे पत्र आंदोलकांना देताना सा.पो.नि.पंकज पवार