आपले जीवन नेहमी हसतमुखाने जगावे ; डॉ.मनोहर मोदी

0
जत,संकेत टाइम्स :जीवन अमुल्य आहे.आपले जीवन नेहमी हसतमुखाने आनंदी जगावे,कोणत्याही प्रकारचा ताण तणाव करून घेऊ नये,असे प्रतिपादन जत येथील ज्येष्ठ डॉ.मनोहर मोदी यांनी केले.

 

ते साईनगर येथील परिवर्तन हॉलमध्ये आयोजित केलेल्या जनक्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.परिवर्तन हॉलमध्ये जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू सावंत यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी ही संस्था सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात कलाकारांच्या साठी स्थापन केली असल्याचे सांगितले. तसेच कलाकारांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

 

संस्थेचे सचिव सहदेव माळी यांनी संस्थेच्या अटी व शर्ती याबाबत मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून मिरज पंचायत समितीच्या माजी सभापती माणिकताई माळी,यांनी संस्थेच्या कामास शुभेच्छा दिल्या.नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणेबाबत सूचना देण्यात दिल्या.

 

 

यावेळी लायन्स क्लब जत अध्यक्ष सौ सुरेखा पतंगे,डॉ.नितीन पतंगे,जय मल्हार फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमंत चौगुले शिवसेना उपतालुका प्रमुख तुकाराम डफीन,साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे,रवी सोलंकर,सहादेव माळी,तळपते मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा डॉ.मनोहर मोदी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन मदने मॅडम यांनी केले.
जत येथील जनक्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या उद्घाटन प्रंसगी उपस्थित डॉ.मनोहर मोदी,माजी सभापती माणिकताई माळी आदी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.