येळवीत भरला तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचा मेळा | ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेकडून आयोजन ; कब्बडी,क्रॉसकट्री,खो-खो,भालाफेकसह विविध स्पर्धा संपन्न

0
येळवी : येथील ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था संचलित ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या वतीने कब्बडी, खो-खो, हॉली-बॉल, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रस्सीखेच, अशा विविध प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उदघाटन येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, माजी सरपंच मारूती जमदाडे, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मा रेवे, अशोक चोपडे, टोणेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू  नुलके, तुकाराम व्हळगुळे(मा.उपसरपंच) तसेच  संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं .सदस्य संतोष पाटील, एकलव्य अकॅडमी चे संस्थापक ज्ञानेश्वर आवटे, नवनाथ पवार, तुकाराम सुतार, सचिन स्वामी, राजू कदम, विजय कदम, विजय पाटील, घोलेश्वरचे उपसरपंच हुसेन नाईक, अमजद नदाफ, समशेर नाईक, देवा कोडोलकर, सुभाष चौगुले,मारूती मदने आदींच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली.
ही स्पर्धा नेहरू युवा केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आली होती यावेळी नेहरू युवा केंद्र सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी सौ.अरुणा कोचुरे उपस्थित होत्या त्यांनी यावेळी  नेहरू युवा केंद्राविषयी माहिती सांगितली व  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विजेत्या खेळाडूना प्रमाणपत्र वितरण केले.
या स्पर्धेत जवळपास 300 खेळाडुनी आपला सहभाग नोंदवला सर्व खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून खेळात रंगत आणली. ग्रामीण भागातील युवकांना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धा ओंकार स्वरूपा ने आयोजित करून खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे काम केले आहे.
यावेळी येळवीचे उपसरपंच सुनिल अंकलगी  म्हणाले, ग्रामीण भागात गुणवंत खेळाडू आहेत परंतु या खेळाडूंना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे ओंकार स्वरूपा फौंडेशनच्या माध्यमातून या पुढील काळात विविध क्रीडा प्रकारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून ग्रामीण भागातील युवकांच्या खेळाला चालना देणार असल्याचे मत यावेळी उपसरपंच सुनिल अंकलगी यांनी व्यक्त केले.

 

●  विविध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे ….
▪️धावणे मुली  (800 मी.)
प्रथम क्रमांक :- श्रुती तांबे
द्वितीय क्रमांक:- दिव्या क्षिरसागर
▪️धावणे मुले(1600 मी.)
प्रथम क्रमांक:-  महादेव गळवे
द्वितीय क्रमांक:- सिद्धू काशीद
▪️थाळीफेक मुले
 प्रथम क्रमांक:-  विशाल सुर्वे
द्वितीय क्रमांक:- गुरुदास बंडगर
▪️थाळीफेक मुली
 प्रथम क्रमांक:-  स्वप्नाली भंडारे
 द्वितीय क्रमांक:- मोनाली भंडे
▪️गोळा-फेक मुले
प्रथम क्रमांक:- हर्षद आवटे
द्वितीय क्रमांक:-  ऋतिक पवार
▪️गोळा- फेक मुली
प्रथम क्रमांक:-  योजना चौगुले
द्वितीय क्रमांकः- मोनाली बंडे
▪️भाला-फेक मुले
प्रथम क्रमांक:-विजय सोलनकर
द्वितीय क्रमांक:- तुषार माने
▪️भाला-फेक मुली
प्रथम क्रमांक:- गीतांजली गायकवाड
द्वितीय क्रमांक:- कोमल पवार
▪️व्हॉली-बॉल स्पर्धा.. (विजयी संघ)
 ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येळवी.
▪️कबड्डी स्पर्धा..(विजयी संघ)
 गजानन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जाडरबोबलद
 ▪️ खो-खो स्पर्धा..(विजयी संघ)
गजानन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जाडरबोबलद ..
रस्सीखेच स्पर्धेने सर्वांची मने जिंकली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओंकार स्वरूपा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भारत निळे सहशिक्षक दत्तात्रय चौगुले, कृष्णा देवकते, कुमार वाघ,  बसवराज (जत्ती) सर सौ. प्रियंका कदम,सौ.राणी गंगणे या शिक्षकांचे तसेच प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
येळवी ता.जत येथील तालुकास्तरीय स्तरीय स्पर्धेतील क्षण,विजयी संघाना विविध मान्यवरांच्याहस्ते बक्षिण वितरण करण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.