प्रज्ञावंत,युवा ; नेते रमेशराव चौगुले

0
भिवर्गीचे युवा नेते रमेशराव चौगुले,कर्तृत्वाच्या गगनात स्वच्छंदरित्या विहार करणारे आपल्या अंगबळावर समाजविकास कार्याचा व रचनात्मक परिवर्तनाचा रथ काही योजनेपुढे ओढून नेऊ पाहतायेत.आयुुष्यातील प्रत्येक पाऊल हे टाकताना आव्हान वाटते. मात्र आव्हानाला बुध्दिमतेची आणि आत्मविश्वासाची जोड दिली की प्रत्येक आव्हानावर मात करणे कठीण नसते. हे कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून शिकायला मिळते हे रमेशरावांच्या कर्तृत्वा वरून सिध्द होते.
कर्तृत्वदक्ष प्रशासक संयमी वक्तृत्व,नितीसंपन्न ग्रहस्थ व मातृपितृ भक्त पुत्र हे रमेशरावाचे व्यक्तिमहत्वाचे काही ठळक पैलू,शिक्षक असलेले मल्लेशप्पा चौगुले यांचे कनिष्ठ चिरजिंव सर्वाचे लाडके, प्रज्ञेने,वृत्तीने व विचारांनी स्वंतत्र होते.आपली बुध्दिमता,कार्यक्षमता,व नितीमता यावर अढळ विश्वास असणाऱ्या रमेशरावांना कोणाच्या ओंजळीचे पाणी पिणे कधी जमले नाही.भिवर्गीत सहावी पर्यत,तिंकोडीत दहावी पर्यत,संखमध्ये बारावी पर्यत शिक्षण घेऊन रमेशरावांनी लोकनेते मोहनराव कदम कॉलेज ऑफ अग्रिकल्चर कडेगांव येथे बि एस्सी आग्रिकल्चर ही पदवी प्राप्त केली.

 

खरेतर उच्च शिक्षण घेऊन उच्चपदस्थ नोकरी करण्याचे स्वप्न बाळगलेल्या तरूण ग्रामपरिवर्तन व रचनात्मक विकासकार्याच्या यज्ञकुंडात उर्वरित आयुष्य झोकून देतो हि अतिशय विलक्षण व निर्णायक घटना आहे.वडीलाचे आदर्श संस्काराची ज्योत सातत्याने प्रज्वलित ठेवण्याचे फार मोठे व जबाबदारीचे कार्य त्यांच्या खाद्यावर आहे.ज्येष्ठ व्यक्तिचा आदर व कनिष्ठांना बरोबर घेऊन वडिलांनी निर्माण केले वलयांकित लोकसमुहाचा पसारा संभाळण्याचे अवघड कसरत रमेशराव धिरोदात्तपणे पार पाडत आहेेत.

 

चातुर्य ,लोकसंपर्क दुरदृष्टी,समकालीन राजकीय प्रवाहाचा अभ्यास, जनतेचा कल या सर्वाचा मेळ बसवावा लागतो.समकालीन नेत्यांशी कधी चुचकारून तर कधी सख्य धरून तर कधी मौन बाळगून तर कधी हळूच बगल देऊन स्वत:चा सामर्थशाली आयाम उभा करणे गरजेचे असते. अर्थात रमेशरावाकडे असणाऱ्या धुर्त व धोरणी निर्णय क्षमते द्वारे विरोधकांना नामोहरम करून त्यांचा कार्यक्रम घडवून आणण्यात हातखंडा आहे.
भविष्यात नवनिर्मान मध्ये रमेशराव नवे आयाम ठरतील एवढे निश्चित आहे.
आज त्यांच्या वाढदिवस,त्यांच्या पुढील आयुष्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
Attachments area
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.