जत : सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत शिवसेना जत तालुक्याच्या वतीने साईनगर येथील परिवर्तन हॉलमध्ये पत्रकार सन्मान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्य प्रवक्ते दिनकर पतंगे यांनी पत्रकारांनी आपल्या लेखणीतून वैशिष्ट्यपूर्ण शैली मधून आदर्श समाज घडवावा असे प्रतिपादन केले.आज हा पत्रकार लोकशाहीचा चौथा खांब आहे,तो देशाचा मोठा आधारस्तंभ आहे.यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी मजबूत ठेवून समाजात घडणाऱ्या सत्य घटनेवर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करावा.
आपले मजबूत अस्तित्व समाजामध्ये निर्माण करावे असेही पतंगे यांनी सांगितले.पत्रकार दिनानिमित्त श्री.पतंगे,शिवसेना तालुका संघटक अमित दुधाळ,
महाराष्ट्र कामगार सेनेचे तालुका प्रमुख सुरेश घोडके,उप तालुका प्रमुख सोमनाथ पाटील,कामगार सेनेचे शहर प्रमुख रोहित पवार,जत तालुका ओबीसी समन्वयक रवि सोलंकर,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरळी यांच्याहस्ते जत तालुक्यातील
सुमारे ५ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्व पत्रकारांनी कामगार सेनेच्या आणि शिवसेनेच्या समाज उपयोगी कामावरती मोठा विश्वास दाखविण्यात आला जत तालुक्यामध्ये कामगार सेना व शिवसेनेचे काम प्रगतिपथावर असल्याचे पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.