शेतकऱ्यांच्या उभारणीत सेवा सोसायट्याचा मोठा वाटा ; दिग्विजय चव्हाण | मिरवाड सोसायटी नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

0
डफळापूर, संकेत टाइम्स : जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सोसायट्या आर्थिक कणा ठरल्या आहेत,तशाच पध्दतीने मिरवाड सोसायटीने गावातील सभासद शेतकऱ्यांना प्रगतीकडे नेहण्यासाठी प्रयत्न करावेत,त्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी कटाक्ष ठेवावा,असे आवाहन पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी केले.

 

मिरवाड सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन यलाप्पा तोडकर,व्हा.चेअरमन बापूसो हांडे सह नुतन संचालकांचा लोकनेते सुनिलबापू चव्हाण युथ फांऊडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी चव्हाण बोलत होते.
यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण,श्री.बुवानंद निधी लि.डफळापूरचे व्हा.चेअरमन बाळासाहेब चव्हाण,युवा नेते भारत गायकवाड(सरकार),तानाजी चव्हाण,माजी संरपच आण्णासो चव्हाण,मिरवाड ग्रा.प.सदस्य आकाश कांबळे,ग्रा.पं.सदस्य कुडणूर गोविंद शिंदे,सागर सवदे,रावसाहेब सवदे,धिरज पाटील,नुतन संचालक सुरेखा यलाप्पा तोडकर
घड्याप्पा विठोबा लवटे,बाळासो सदाशिव लवटे,बाळासो कृष्णा सुंबळे,राजू शंकर पाटील,सिताराम इंद्रा कांबळे
आदी मान्यवर उपस्थित होते.

 

चव्हाण पुढे म्हणाले,ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा कणा ठरलेल्या गावपातळीवरील प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्यांचे अस्तित्व निर्विवाद आहे.विविध पिकांचे कर्ज रोखे, पाईपलाईन,ट्रँक्टर,अवजारे, व मोटरी साठी या सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा,जेणेकरून आपल्या गावातील शेतकरी समृद्ध व्हावा.

 

दुसरीकडे वसुलीही शंभर टक्के करून सभासदांना वर्षाकाठी लाभांश द्या.विकास सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साधन आहेत,हे ब्रीद कायम पदाधिकाऱ्यांनी स्मरणात ठेवावे.

 

मिरवाड ता.जत येथील महालिंगराया सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,भारत गायकवाड आदी

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.