जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरचं बसविण्यात येणार ; उमेश सांवत यांची माहिती | १९ फेंब्रुवारीला जयंतीचे जंगी नियोजन

0
4
जत,संकेत टाइम्स : जत – सांगली मार्गावरील मराठी शाळेसमोरील चौकात असलेल्या चबुत-यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असून दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीसमिती चे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्याचे प्रतिपादन जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व स्मृति समितीचे पदाधिकारी उमेश सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
श्री. सावंत म्हणाले, जत येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज  चौकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा संगमरवरी आकर्षक असा पुतळा बसिण्यात आला होता.

 

 

 केंदीय कृषी मंत्री ना.पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज  पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर दहावर्षापूर्वी झालेल्या एका चारचाकी वाहनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भोवताली असलेल्या लाकडी मेघडंबरीस जोरदार धडक दिल्याने या ठिकाणी असलेल्या मेघडंबरीचे व अंशतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकसान झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी परत बसविण्याचा निर्णय झाला. त्यादृष्टीने जुना संगमरवरी पुतळा न बसविता लोकवर्गनी काढून नविनच पुतळा बसविण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानंतर मिरज येथिल सुप्रसिद्ध शिल्पकार श्री.गजानन सरगर यांच्याकडे या पुतळ्याचे काम सोपविले. शिल्पकार सरगर यानी लोकवर्गनीतून जमा झालेल्या रक्कमेच्या बजेटप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभा असलेला  पाचफुटी पुर्णाकृती पुतळा बनविला.

 

 

परंतु जत नगरपरिषदेने तयार केलेल्या चबुत-यावर हा पुतळा लहान दिसत असल्याने परत सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा बसविण्याचे ठरले.
त्यानंतर जतचे माजी आमदार श्री. विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीसमिती स्थापन करून त्यामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी घेऊन  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामासाठी वर्गणी जमा करणे सुरू केले.

 

 

आतापर्यंत शिल्पकार गजानन सरगर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारूढ पुतळ्याचे कामासाठी बारालाख रूपये देण्यात आले असून अजून सहा लाख रूपये लागणार आहेत. त्यासाठी आम्ही लोकवर्गनी गोळा करीत असून या वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा साडेबारा फुट उंचीचा अश्वारूढ पुतळ्याचे काम होणार असून शिवप्रेमीनी यासाठी भरिव असा निधी स्मृतीसमितीकडे द्यावा, असे आवाहन ही सावंत यांनी केले आहे.

 

शिल्पकार सरगर यानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारूढ पुतळा जवळ जवळ पुर्ण केला असून ते पुतळ्यावर शेवटचा हात मारण्याचे काम करित आहेत. दिनांक २५ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारूढ पुर्णाकृती पुतळा जत शहरात आणण्यात येणार असून या पुतळ्याची जत शहरातून वाजत गाजत मिरवणूक ही काढण्यात येणार आहे.

 

 

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपूर्वी हा अश्वारूढ पुतळा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची येणारी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करित आहोत असेही सावंत म्हणाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here