जत तालुक्यातील ४ कोटीच्या विकास कामाचे आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते भूमीपुजन

0
जत : जत तालुक्यातील कर्नाटक हद्द, उमराणी, जत, निगडी, येळवी, लोणार, जदरबोबलाद, सोन्याळ ते रा. मार्ग १५५ ला मिळणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा  करणे या ४१०.४७ लक्ष रु. निविदा रकमेच्या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी येथील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणेमुळे येथील शेतकरी व व्यावसायिकाना याचा भरपूर लाभ होणार आहे. अरुंद रस्ता, खोल साइडपट्ट्या, रस्त्यावरील खड्डे यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांना ही येथून प्रवास करणे धोक्याचे बनले होते. रस्ते रुंदीकरण व सुधारणांमुळे याचा नक्कीच वाहनधारकांना लाभ होणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.