येळदरीतील सिद्धेश्वर मंदिराच्या पायाभरणी कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते संपन्न

0
जत : येळदरी (ता.जत) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या पायाभरणी कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आला. येळदरी व परिसरातील सर्व भाविक-भक्तांच्या तसेच सरपंच, उपसरपंच व सर्व गावकरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

 

¶ आजचा दैनिंक संकेत टाइम्स वाचा एका क्लिकवर 

Rate Card

 

श्री सिद्धेश्वर हे येथील तमाम ग्रामस्थांचे व पंचक्रोशीतील गावकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. या नव्या मंदिराच्या उभारणीमुळे येथील भाविक-भक्तांची बऱ्याच दिवसांची असणारी श्री सिद्धेश्वराचे मोठे मंदिर निर्माण व्हावे ही मनोकामना पूर्ण होणार आहे. मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या संदर्भात येथील पदाधिकारी व इतरांना आमदार सांवत यांनी सूचना दिल्या. त्यामुळे मंदिराचे काम लवकरच पूर्ण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.