मुंबईतील व्यापाऱ्यांची मुंचडीत आत्महत्या

0
जत,संकेत टाइम्स : कोगनळी येथील राजाराम सूर्याबा माने या ४५ वर्षीय व्यापाऱ्याने मुचंडी (ता.जत) येथील वनखात्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.घटनेची नोंद जत पोलीसात झाली आहे.

 

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,
माने व्यवसायांनी कलिंगडाची मोठे व्यापारी आहेत मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये स्वतंत्र दुकान गाळा आहे. त्याचा भाऊ आणि मयत राजाराम असे दोघे मिळून कलिंगडाचा होलसेल व्यापाराचा व्यवसाय आहे. राजाराम माने हे कुटुंबियासह मुंबईत वास्तव्यास  होते.तथापि एक वर्षापुर्वी ते गावी कोगनळी येथे आले होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मुंबईहून गेली चार पाच दिवसापूर्वी गावी आले होते.शनिवारी दुपारी तीन वाजता आपली स्वतःची मालकीची गाडी घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांनी मुचंडी येथील वनखात्याच्या हद्दीत एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने पोलीस तपासात उघड झाली आहे. मयत राजाराम माने यांनी गळफास घेतलेल्या ठिकाणीच गाडी लावली होती.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.