हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी

0
संख,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख येथील ग्रामपंचायत मध्ये हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे,महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस या थोर दोन महान पुरुषांचे जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त फोटो पूजन सरपंच सौ. मंगल पाटील, ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते तर हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त फोटो पूजन जी.आर.पाटील सर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण अवरादी यांच्या हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. मंगल पाटील होत्या.यावेळी संख ग्रामपंचायतीचे नूतन ग्रामविकास अधिकारी म्हणून मा.श्रीशैल बिरादार यांनी पदभार स्वीकारलाने त्यांचा सत्कार ह. भ.प. तुकाराम बाबा महाराज व जी. आर.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला.
   जयंती कार्यक्रमात चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले,महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिव सेनेची स्थापना केली.सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेने भारत स्वातंत्र्य करण्यासाठी मोठे योगदान दिले. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिव सेनेच्या माध्यामातून मराठी युवकांना संघटीत करुन न्याय दिला.नोकरी मिळवून दिल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शिव सेनेचे योगदान मोठे होते.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले. राजकारणात कोणतेही पद घेतले नाही. या दोन्ही नेतांचा आदर्श राज्यकर्ते व तरुणांनी घ्यावा. असे आवाहन केले.
      यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रवीण आवरादी,युवासेना संख शाखा प्रमुख व्यकटेश जोशी, मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी उपसरपंच एम.आर.जिगजेणी,युवासेना तालुका प्रमुख प्रवीण आवरादी,युवासेना संख शाखा प्रमुख व्यकटेश जोशी, जाडरबोबलाद येथील युवा सेनेचे रमेश कदम, प्रकाश कांबळे,दऱ्याप्पा बालगाव,ग्रामविकास अधिकारी मा. श्रीशैल बिरादार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

संख (ता.जत) येथील ग्रामपंचायतीमध्ये वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.यामध्ये ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.