जनतेच्या प्रश्नासाठी प्रसंगी तुरूंगात पण जावू ; तम्मनगौडा रवी पाटील

0
जत : जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी अडचण नाही मी लढतच राहीन, वेळ आल्यास तालुक्यातील जनतेसाठी तुरुंगात पण जावू, अशी प्रतिक्रीया जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सदस्य तम्मनगौडा रवी पाटील यांनी दिली.
रवीपाटील म्हणाले, लोकांसाठी जो काही त्रास होईल,तो सहन करण्यास तयार आहे, कामात टाळाटाळ करणाऱ्या श्री. लोखंडे यांनी आपल्या विरोधात तक्रार करताना स्वतःचे उध्दट वर्तन मात्र लपवले असल्याचा दावाही तम्मनगौडा रवी पाटील यांनी केला.

 

अधिक माहिती देताना तम्मनगौडा रवी पाटील यांनी सांगितले की, सदस्य पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या वसंत व घरकुल योजनेतील मंजूर कामांची ऑर्डर काढण्यास विलंब होत होता, याबाबत सीईओ यांना विचारले असता त्यांनी आपण मागेच सही केल्याचे सांगितले. मात्र ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे हे ऑर्डर काढण्यास टाळाटाळ करत होते. अनेकदा फोन करूनही फोन उचलत नव्हते.

 

आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जनतेला उत्तरे द्यावी लागतात. टाळता येत नाही.त्याबाबत विचारत असताना झालेले संभाषण व्हायरल केले आहे मात्र ते करतानाही त्यामध्ये काटछाट केली आहे,असेही रवी पाटील म्हणाले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.