महिलांनी आपल्या आरोग्याचे शिल्पकार आपण स्वतः बनावे ; सौ.सुरेखा पतंगे

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील साईनगर येथील त्रिमूर्ती निवास मधील परिवर्तन हॉलमध्ये लायन्स क्लब जत आणि जत तालुका पतांजली योग समिती जत यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमुर्ती योगा मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे उद्घाटन पतांजली योग समितीचे प्रभारी आर.जी. माळी आणि लायन्स क्लब जतच्या अध्यक्षा सौ.सुरेखा पतंगे तसेच पतांजली योग समिती महिला प्रभारी सौ.साखरूबाई घोडके तसेच स्वाभिमान भारतचे तालुका अध्यक्ष बसवराज माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

यावेळी सौ.पतंगे म्हणाल्या की,महिलांनी  योग्य आहार नियमित व्यायाम नियमित प्राणायाम करावीत,त्याशिवाय प्रत्येक नागरिकांनी नेहमीच योगा करून आपण स्वतः निरोगी रहावे.
स्वाभिमान भारतचे अध्यक्ष बसवराज माळी म्हणाले, श्री.पतंगे हे रोज काही ना काहीतरी उपक्रम राबवून लोकांना उपयुक्त असे कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.सध्या ते राजकारणापेक्षा ही पलीकडचे त्यांचे व्यक्तिमत्व तयार झालेले आहे.हे नेहमीच उत्साही कार्यक्षम अधिक असतात.ते कधी कंटाळले दिसत नाहीत,यांच्याकडे नेहमीच ऊर्जेचा साठा दिसून येत आहे.हा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे,असेही माळी म्हणाले.

 

आर जे माळी यांनी काही रुग्णांची तपासणी केली योग्य मार्गदर्शन केले.सर्व पदाधिकारी यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजू सावंत,जत तालुका ओबीसी समन्वयक रवी सोलंकर,महाराष्ट्र कामगार सेना तालुका उपप्रमुख सोमनाथ पाटील, शंकर कॉलनीचे शाखाप्रमुख भिमराव आडसुळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर जत लायन्स क्लब जतचे नवीन मेंबर सौ.सुरेखा मासाळ,सौ. साखरुबाई घोडके,संगीता पवार,सौ. नीलांजली शिंदे सौ.रेखा कल्याणी या नवीन सभासदांचा अध्यक्ष यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

 

त्यानंतर लायन्स आणि लायनेस क्लबच्या अध्यक्षा सौ.इंद्रायणी माळी यांच्या वतीने सर्व महिलांचा हळदी कुंकू व तिळगुळ चा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लब कॅबिनेट ऑफिसर दिनकर पतंगे यांनी केले तर आभार कॅबिनेट ऑफिसर लायन राजेंद्र आरळी यांनी केले.

 

या कार्यक्रमामध्ये 35 सभासदांनी भाग घेतला.हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला.जत लायन्स क्लब या ही पुढे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविणार असल्याचे श्री.पतंगे यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.