उमदी : उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटील यांना पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्याकडून कोव्हीड-१९ व सर्व सण उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता सहकार्य केलेबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. उमदी पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील यांना स्टेशनचे सा.पोलीस निरिक्षक पंकज पवार व उपनिरीक्षक शिंदे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देण्यात आले.
यावेळी सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम व उमदी पोलीस स्टेशनचे सा.पो.नि.पंकज पवार व उपनिरीक्षक शिंदे यांचे आभार मानले.