ग्रामपंचायत कुमठे ट्रॅक्टर चोरीचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलीस ठाणेला यश

0
तासगाव : दि. ३१/०८/२०२१ रोजी ग्रामपंचायत कुमठे, ता.तासगाव यांचे मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अज्ञात इसमांनी चोरुन नेला होता. सदरबाबत तासगांव पोलीस ठाणे, जि. सांगली यांचेकडे गुन्हा नोंद क्र. ४३६/२०२१ भा.द.वि.स.कलम ३७९. ३४ प्रमाणे दि. ३१/०८/२०२१ रोजी गुन्हा दाखल
होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेला माल तात्काळ हस्तगत करणेबाबत पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली अजित टिके यांनी मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

 

 

त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर ट्रॅक्टर चोरी मध्ये सहभागी असलेला आरोपी आकाश रामचंद्र मदने, (रा. पद्माळे, ता.मिरज) यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन त्याचा साथीदार बिरु ऊर्फ विजय अशोक टोकले. (मुळ गांव हांगीरगी, ता.सांगोला, जि.सोलापुर, सद्या रा. भिलवडी, ता.मिरज, जि.
सांगली)याच्या मदतीने चोरुन ट्रॅक्टर वरील नांव व नंबर प्लेट काढुन टाकुन कागदपत्रे नंतर देतो असे सांगुन त्याची विक्री केलेली आहे,असे सांगीतल्याने सदरचा ट्रॅक्टर किंमत २,००,०००/- रुपयेचा हस्तगत करण्यात आलेला आहे.

 

संशयित व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशिर कारवाई करणेकरीता तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई निरीक्षक शिवाजी गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोहेकॉ/रमेश कोळी व पोहेकॉ/कपील साळुंखे, पोना/महेश जाधव, पोना/ सचिन मोरे यांनी केलेली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.