भारतातील सर्व शाळा महाविद्यालयात सावित्री आई च्या प्रतिमा हव्यात ; पँथर डॉ. राजन माकणीकर

0
मुंबई : भारतातील तमाम शाळा महाविद्यालयातून शिक्षणाच्या काल्पनिक मूर्तींना काढून वास्तवातील शैक्षणिक देवता आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा हव्यात असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.
डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की शाळेत कोणत्याही एका धर्माची पूजा, आरती, श्लोक, गाणी किंवा मंत्रोच्चार ना करता फक्त आणि फक्त भारत देशाचे राष्ट्रगाण, संविधान प्रस्तावना, प्रतिज्ञा चे वाचन व पठण होऊन देशभक्ती पर गीत गायले जावे. हा नियम म्हणजे कायदाच बनवण्यात यावा, जेणे करून सर्व बालकां मध्ये धर्मांधता न रुजता देशप्रेम रुजवता येईल.
देशातील शालेय मुलांना धर्मांधतेचे पाठ न पढवता त्यांना देशाबद्दल देशातील महामानवांबद्दल जागरूक करावे, संविधानाबद्दल शिक्षित करावे, धर्मांध बनवून युवा पिढीच्या हातात चिलीम ना देता लेखणी देऊन देशाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहतील असे व्यक्तिमत्व निर्माण करावे असेही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर म्हणाले.
शाळा कॉलेजात ड्रेस कोड असणे आवश्यक आहे, कोणत्याही धर्माच्या भावना दुखवू नयेत असा ड्रेस कोड सरकारने शाळा कोलेजांना करण्याचे आदेश द्यावेत जेणे करून संविधानाची पायमल्ली ना होता कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहील व असे कोणतेही गोंधळ भविष्यात होणार नाहीत. संविधान व्यक्ती स्वातंत्र्य देते ते अबाधित राहिले पाहिजे, असाही सल्ला यावेळी पँथर राजन माकणीकर यांनी दिला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.