जिल्हा परिषदेच्या शाळेला पालकाने दिली 35 हजारांची पुस्तके

0
जत :
जत येथीलआयएसओ मानांकित आणि मॉडेल स्कूलमध्ये अंतर्भाव असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 या प्रशालेला एका पालकाने तब्बल 35 हजारांची पूरक वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. डॉ. कोमल राजेश चाचे व तलाठी राजेश चाचे हे ते पालक आहेत.
पहिली इयत्तेत शिकत असलेल्या कु. ज्ञानेश्वरी चाचे या विद्यार्थिनीचे वडील तलाठी आणि आई डॉक्टर आहेत. जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ही शाळा शैक्षणिक गुणवत्ता आणि अन्य उपक्रमात आघाडीवर असून शाळेचा पट 321 आहे. शाळेने दोन वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन मिळवले असून सध्या मॉडेल स्कूलमध्ये अंतर्भूत आहे. शाळेत बाला उपक्रम, संगणक कक्ष, क्रीडा साहित्य, इ-लर्निंग आदी उपक्रम राबवले जात आहेत. गटशिक्षणाधिकारी साळुंखे व केंद्रप्रमुख श्री. कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या इमारत बांधकाम, भौतिक सुविधा व ग्रंथालय सुसज्जता यासाठी  शासन व लोकवर्गणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
आतापर्यंत शाळेला तीन लाखांहून अधिक लोकवर्गणी मिळाली आहे. ग्रंथालय सुसज्जतेसाठीही पालक वर्गणी देत आहेत. राजेश चाचे व डॉ. कोमल  राजेश चाचे यांनी शाळेला 35 हजारांची पुस्तके भेट दिली. यावेळी मुख्याध्यापिका उषा ढेरे, केंद्रप्रमुख संभाजी कोडग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन मानेपाटील, उपाध्यक्ष राधिया शेख, शिक्षिका आशा आवळे, सुनीता कदम, मीनाक्षी शिंदे, वर्षादेवी जगताप, ज्योती भोसले, हणमंत मुंजे आदी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.