कोंतेबोबलादमध्ये अद्यावत पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण 

0
जत, संकेत टाइम्स : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील कोंतेयबोबलाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ चे उदघाटन सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते झाले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, जतचे सभापती मनोज जगताप, माजी सभापती आकारांम मासाळ आर. के. पाटील, तम्मणगौडा पाटील, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंह जगताप, राजेंद्र कननुरे, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, उपसभापती विष्णू चव्हाण, नगरसेवक प्रकाश मोटे, मिथुन भिसे,  भाजप शहराध्यक्ष आण्णा भिसे, आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती.

 

 

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उदघाटनानंतर विलासराव जगताप यांचे नातू, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंह जगताप यांनी पाच कोटी रुपये खर्चून उभा केलेल्या जगताप स्टोन क्रशर अँणड क्रशड सॅन्डचे उदघाटन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उदघाटनपर भाषणात बोलताना खा. संजयकाका पाटील म्हणाले की, जतसारख्या दुष्काळी भागात पशुपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. या भागात अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाने काळाची गरज आहे. नेमके हेच हेरून माजी आमदार विलासराव जगताप, सभापती मनोज जगताप यांनी पाठपुरावा करून कोंतेयबोबलाद येथे हा श्रेणी दोनचा दवाखाना मंजूर करून घेतला आहे. सीमेवर असलेला या दवाखान्याचा फायदा हा निश्चितच पशुपालकांना होणार आहे.

 

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जगताप कुटूंबियांचे समाजकारण, राजकारण यातील योगदान जतच्या विकासासाठी वरदान ठरले आहे. विलासराव जगताप यांनी जतच्या पाण्यासाठी कायम लढा दिला, त्यांच्या काळात म्हैसाळला भरीव निधी आला त्यामुळे आज जतची वाटचाल सधन भागाकडे सुरू झाली आहे. संग्रामसिंह जगताप यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायास पसंती दिली आहे. कर्नाटक येथून पूर्वी खडी व क्रशड सॅन्ड आणले जायचे. त्याला परवानगी नसल्याने ती उपलब्ध होत नव्हती पण आता जत तालुक्यातील पूर्व भागात सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
दुष्काळी फोरम एकाच व्यासपीठावर
सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या आणि त्यांच्याकडून होणाऱ्या विकास कामांविषयी नाराज असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या विकासासाठी २०१३ मध्ये ‘दुष्काळी फोरम’ तयार केला होता. हा फोरम आता पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र या कार्यक्रमाच्या रूपाने पहावयास मिळाले. दुष्काळी फोरमचे प्रणेते विलासराव जगताप यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना एकाच व्यासपीठावर आणले. खा. संजयकाका पाटील गद्दार असल्याचा आरोप केल्याने जगताप व संजयकाका यांचे बिघडलेले सुरूही  जुळलेले येथे पहावयास मिळाले. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनाही या कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते पण ते बाहेरगावी असल्याने येवू शकते नाहीत मात्र त्यांनी कार्यक्रमाला आवर्जून शुभेच्छा दिल्या. एकूणच या कार्यक्रमात उदघाटन सोहळा रंगला असला तरी चर्चा मात्र दुष्काळी फोरमची रंगली.
जत ःकोंतेबोबलादमध्ये अद्यावत पशुवैद्यकीय दवाखान्याचे उदघाटन करताना  खा. संजयकाका पाटील. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आ. पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप यांची उपस्थिती होती.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.