जतजवळ अपघात; जखमी ऊसतोड मजूर तासभर रस्त्यावरच पडून | तुकाराम बाबांनी वाचवले तरुणाचे प्राण

0
जत, संकेत टाइम्स : जत-कुंभारी राष्ट्रीय महामार्गावरील कंठी जवळ महामार्गाचे काम अर्धवट आहे. याच ठिकाणी मोटार सायकल स्लिप होवून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात तालुक्यातीलच ४० वर्षीय तरुण व त्याची पत्नी जखमी झाली. तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने जखमी तरुण रस्त्याकडेला पडला होता तर त्याची पत्नी मदतीसाठी तासभर सर्वांना आवाहन करत होती. जतपासून काही अंतरावर अपघात झालेला असतानाही १०८ रुग्णवाहिकाही तेथे आलीच नाही. सुदैवाने याच दरम्यान चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे पुण्याहून आपल्या गोंधळेवाडी ( संख ) कडे जात असताना त्यांना रस्त्याकडेला गर्दी दिसली.

 

त्यांनी उतरून पाहिले असता तरुण जखमी अवस्थेत पडला होता तर त्याची पत्नी ही मदतीसाठी आवाहन करून जखमी पती शेजारी अश्रू गाळत बसली होती. क्षणांचाही विलंब न लावता तुकाराम बाबा यांनी जखमी तरुणाला व त्याच्या पत्नीला स्वतःच्या गाडीत घालून जत ग्रामीण रुग्णालय गाठले. जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगलीला पाठवले.जत ग्रामीण रुग्णालयात त्याही वेळी १०८ गाडी लवकर मिळू शकली नाही यावरून जत आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
जत तालुक्यातील माडग्याळ येथील ४० वर्षीय भिमु मारुती कोळी हे पलूस येथे पत्नीसह ऊसतोडी  मजुरी करतात. शुक्रवारी भिमु कोळी हे त्यांच्या पत्नी प्रफुल्लतासह मोटरसायकलने माडग्याळला आपल्या आजारी असलेल्या आई व वडिलांना भेटण्यासाठी निघाले होत्र कुटूंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. कुंभारीच्या पुढे आल्यानंतर कंठी जवळ महामार्गाचे काम अर्धवट राहिले आहे. याच रस्त्यावर त्यांची मोटारसायकल स्लिप झाली व दोघेही पतीपत्नी जखमी झाले. भीमरावच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी होवून रस्ताकडेला अर्धबेशुद्ध अवस्थेत पडले. पत्नी प्रफुल्लता याही अपघातात किरकोळ जखमी झाल्या.

 

 

पती अर्धबेशुद्ध अवस्थेत पडल्याने घाबरलेल्या पत्नीने मदतीसाठी येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना, नागरिकांना मदतीचे आवाहन केले पण त्यांना कोणीच मदत केली नाही. घाबरलेल्या प्रफुल्लता यांचा मदत मागून घसा कोरडा झाला पण मदतीला कोणीच पुढे आले नाही. सुदैवाने याच वेळीचिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे पुण्याहुन आपल्या गोंधळेवाडी ( संख ) कडे निघाले होते.

 

 

घटनास्थळी झालेली गर्दी व महिलेच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी स्वतःची गाडी थांबवली तेव्हा त्यांना धक्काच बसला. तरुण अर्ध बेशुद्ब पडला आहे, त्याच्या शेजारी महिला रडत बसली आहे, लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेत गर्दी केली आहे. अपघात झाल्याचे बाबांच्या लक्षात आले त्यांनी जखमी तरुण व रडणाऱ्या महिलेला धीर देत नेमके काय झाले आहे हे जाणून घेतले. लोकांना तुम्ही बघत का बसलाय असे विचारले असता त्यांनी १०८ रुग्णवाहिका फोन लागत नसल्याचे सांगत उडवाउडवी केली.

 

 

नेमका प्रकार लक्षात येतात बाबांनी व त्यांच्यासोबत असलेल्या चालकांनी क्षणांचाही विलंब न लावता जखमी ऊसतोड मजूर भिमुला स्वतःच्या गाडीत घालून जत ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने सांगलीला पाठवले. सांगली येथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

 

 

■ बाबांनी वाचविला तरुणाचा जीव
एक तास ऊसतोड मजूर भिमु माळी हा रस्त्यावर पडला. डोक्याला मार लागल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. तुकाराम बाबा महाराज यांनी मदत नव्हे कर्तव्य म्हणत त्याला तातडीने रुग्णालयात पोच केले त्यामुळे त्या तरूणाचा जीव वाचला.

 

 

 

■ १०८ रुग्णवाहिका नावालाच – तुकाराम बाबा
रसत्यावर अपघात घडला की अपघातग्रस्तांचा मदतीसाठी काही वेळात १०८ रुग्णवाहिका पोहचते पण जतला ही रुग्णवाहिका सेवा नावालाच असल्याचे सिद्ध झाले आहे. सेवा सुधारा, अशा वेळी मदत करा अन्यथा आरोग्य विभागाच्या समोरच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना आंदोलन करेल असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.