जतेत लोकभावनेचा आदर करुन शिवजयंती पुर्वी पुतळा बसवा | शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरूजी यांचे आवाहन

0
जत : आमदार श्री. विक्रमसिंह सावंत व माजी आमदार श्री. विलासराव जगताप यानी लोकभावनेचा आदर करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ची प्रतिष्ठापना दि.१९ फेब्रुवारी शिवजयंतीपूर्वी करावी. याकामी प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे श्री. संभाजीराव भिडे गुरूजी यानी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा जत नगरपरिषदेने तयार करण्यात आलेल्या चबुत-यावर बसविण्यात येणार होता.
परंतु जतचे आ.श्री. विक्रमसिंह सावंत व माजी आमदार व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष श्री .विलासराव जगताप यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले. त्यातच जिल्हाधिकारी श्री.अभिजित चौधरी यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी सर्व त्या प्रकारच्या परवानग्या घेतल्याशिवाय मूर्ती ची स्थापना केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याने हे मूर्ती स्थापना प्रकरण चिघळत गेले.
    त्यातच मिरजेहून समिती व शिवप्रेमीनी आणलेली व समितीचे अध्यक्ष माजी आ.श्री. विलासराव जगताप यांच्या पेट्रोलपंपावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा प्रशासन ताब्यात घेणार अशा अफवा पसरल्याने जत शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण तयार होऊ लागले होते.
 प्रशासनाने शिवजयंतीपूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बाहेरून मागविला आहे. यामध्ये राज्यराखीव दलाचे पोलीस ही आले आहेत. त्यानी आज जत शहरातील प्रमुख मार्गावरून वाहनासह संचलन केले.

 

जत येथील जगताप यांच्या पेट्रोलपंपावर असलेला आयशर टेंपोत ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा आज क्रेनच्या सहाय्याने खाली उतरून सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे.आज शिवप्रतिष्ठानचे श्री. संभाजीराव भिडे गुरूजी यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शिवजयंतीपूर्वी झाली पाहिजे ही लोकभावना बनली आहे. यासाठी जतचे आ.श्री. विक्रमसिंह सावंत व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. विलासराव जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच प्रशासनातील अधिकारी यांच्याशीही छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना करणेबाबत चर्चा केली आहे.

 

जत तालुक्यातील लोकांना ही आजी माजी आमदारानी श्रेयवादात न पडता एकमेकांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती स्थापनेवरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण न करता येत्या १९ फेब्रुवारी शिवजयंतीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ मूर्तीची स्थापना झाली पाहिजे अशी लोकभावना बनली आहे,असे आवाहन भिडे गुरुजी यांनी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.