छ.शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा ; तुकाराम बाबा | पोलीस बंदोबस्ताबाबत केली नाराजी व्यक्त
जत,संकेत टाइम्स : मागील सोळा वर्षापासून जतकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतीक्षेत आहेत. लोकवर्गणीतून उभा राहत असलेला हा पुतळा जतमध्ये दाखल झाला आहे, नजरेच्या समोर आहे.पण पुतळा नियोजित जागी बसविण्याऐवजी पूतळयावरून जतला छावणीचे स्वरूप आले आहे हे बरोबर नाही. शिवरायांचा पुतळा बसला पाहिजे ही लोकभावना आहे, पुतळा बसविण्यास कोणाचा विरोध नाही, आजी, माजी आमदारांनीही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे. तेव्हा लोकभावनेचा आदर करत प्रशासनानेच पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
