जत,संकेत टाइम्स : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून मोठा तणाव असलेल्या जत शहरात शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रशासनाच्या परवानगीने एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुजा करण्यात आली.
प्रांरभी आमदार विक्रमसिंह सांवत,डिवायएसपी रत्नाकर नवले यांच्याहस्ते तर काही वेळानंतर माजी आमदार तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप,माजी सभापती सुरेशराव शिंदे,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते पुजन करण्यात आले.तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले शिवछत्रपती मूर्तीपूजन जल्लोषात शिवजंयती साजरी करण्यात आली.
जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पूर्वीच्याच जागेवर जत नगरपरिषदेने लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या चबुत-यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियमावर बोट ठेवल्याने व यावरून तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने जत शहरात राज्य राखीव दलाचे जवानासह दिड हजारावर पोलीसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
यावेळी प्रथमच जत शहरात पोलीसांच्या बंदोबस्तामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, त्याचप्रमाणे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पेट्रोलपंपावर, श्रीमंत विजयसिंहराव डफळे कृषी उत्पन्न बाजार समिती,जत अथणी मार्गावरील गणपती मंदिर परिसरातील स्वराज्य मित्र मंडळ,शासकीय कार्यालये,शाळा तसेच अनेक ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जत येथिल श्रीमंत विजयसिंहराजे डफळे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिराजदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संचालक अभिजीत चव्हाण, सचिव सोमनाथ चौधरी,यल्लपा तोडकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
माजी आ.विलासराव जगताप यांच्या पेट्रोलपंपावर असलेल्या नुकतेच मिरजेहून आणण्यात आलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारूढ मूर्तीला छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. विलासराव जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जत येथिल शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शिवप्रेमी यानी ऐतिहासिक किल्ले रामगड येथून शिवज्योत आणली होती. त्याचे स्वागत भा.ज.प.चे युवानेते संग्राम जगताप यानी केले. शिवप्रतिष्ठानचे अमर जाधव यानी शिवछत्रपती यांचा प्रेरणामंत्र पठण केला.
यावेळी उपस्थित असलेले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नुतन संचालक प्रकाश जमदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार, जि.प.सदस्य व माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील,अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अँड.प्रभाकर जाधव,जत.पं.स.सभापती मनोज जगताप, प्रमोद जगताप, विजय खाडे,रणधिर कदम,आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे, भा.ज.प.चे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, संतोष मोटे, गौतम ऐवळे,बसवराज चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे सिदगोंडा पाटील, सुमित कोडग,शिवसेनेचे नेते बंटी दुधाळ, विजय चव्हाण, शिक्षक नेते दिगंबर सावंत,सुधिर चव्हाण, सुनिल चव्हाण, संग्राम पवार, इम्रान गवंडी, मकसुद नगारजी, नगरसेवक प्रकाश माने, नगरसेविका सौ.दिप्ती सावंत, सौ.उर्मीला विलासराव जगताप, सौ.श्रध्दा शिंदे आदीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारूढ मुर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर आदीनी पोलीस प्रशासनाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी शिवप्रेमी कार्यकर्ते यांनी उपस्थितांना साखर व लाडूचे वाटप केले.जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी येथिल संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.
चौकट
तणाव निवळला, मात्र पोलीस बंदोबस्त कायमशहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अखेर प्रशासनाच्या रितसर सर्व परवानग्या घेऊन पुतळा बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट करत सर्वत्र शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले होते.आमदार विक्रमसिंह सांवत यांनीही शिवाजी चौक येथे तात्पुर्ती बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन केले.त्यामुळे दिवसभर तणाव निवळला होता.
जत शहरातील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दर्शन घेतले.यावेळी किरण शिंदे,पै.सांवत उपस्थित होते.जगताप पेट्रोल पंपावरील छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीचे पुजन माजी आमदार विलासराव जगताप,सुरेशराव शिंदे,प्रकाश जमदाडे,तम्मणगौडा रवीपाटील,अँड.प्रभाकर जाधव, उमेश शांत यांच्याहस्ते करण्यात आले.