जत सोसायटीत विलासराव जगताप,सुरेशराव शिंदे गटाचा मोठा विजय | १३ पैंकी १३ जागा पटकाविला | कॉग्रेस प्रणित पँनेलचा पराभव

0
जत,संकेत टाइम्स : जत विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत माजी आमदार विलासराव जगताप व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे यांच्या पँनेलने निर्वीवाद यश मिळवत १३ पैंकी १३ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली.

 

गतवेळी सोसायटी निवडणूकीत सर्व पक्षांनी एकत्र येत बिनविरोध केली होती.यावेळी दुरंगी लढत झाली.आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वाखालील एक व दुसरे माजी आमदार विलासराव जगताप व सुरेशराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनेलमध्ये थेट सामना झाला.टोकाचा प्रचार राबविण्यात आला.

Rate Card
जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,जिल्हा बँक आदी मुद्दे प्रभावी ठरले.दोन्ही बाजूनी आरोप-पत्यारोप झाले.मात्र माजी आमदार विलासराव जगताप व सुरेशराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनेला सभासदांनी कौल दिला आहे. त्यांचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी झाले आहेत.जत नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह सांवत यांना हा धक्का मानला जात आहे.

 

विजयी उमेदवार असे(कंसात पडलेली मते)मोहन सुभाषराव कुलकर्णी (५३१),स्वप्निल सुरेश शिंदे(५१७),प्रमोद विठ्ठलराव सांवत(५०५),बसाप्पा सिध्दाप्पा बेडगे(४९७),अजित प्रभाकर शिंदे(४८७),विठ्ठल तुकाराम पवार(४७९),हणमंत गंगाराम गडदे(४४४),मनोहर बाळू सांवत(४४१)
भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास वर्ग- हुवाण्णा चन्नाप्पा माळी(५१४),आप्पासो दुर्गाप्पा पवार(५५०),महिला प्रतिनिधी – जुलेखा मोहद्दीन नदाफ(५४३),सुशिला प्रतापराव शिंदे(५१०),अनुसूचित जाती/जमाती- प्रकाश ज्ञानू देवकुळे(५१९)

विरोधी पँनेलचे उमेदवार व त्यांना पडलेली मते – महेश बाळाप्पा खटावे, बाळासाहेब शिवगोंडा तंगडी (३४१), रामचंद्र गंगाराम माळी(३२६),अशोक शंकर शिरगिरे(२७१),अजयकुमार दिलीप शिंदे (१५),काकासो दत्तात्रय शिंदे (३००),सुजय(नाना)अशोकराव शिंदे (३६४),धोंडाप्पा महादेव व्हनवाडे(३१७),संभाजी बाबू हवालदार(२९६),प्रमोद सदाशिव हिवरे(३४८),तुकाराम मल्लाप्पा माळी(३८४),निलेश संभाजी बामणे(३४८),आसना नबीसो पखाली(३१७),कमल जगन्नाथ शिंदे(३४६),संतोष कुमार कांबळे(३८४)निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एस.जावीर यांनी काम पाहिले.विजयानंतर फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.