वाळवा : क्रांती कुटुंबात काम करणारा प्रत्येकजण क्रांती कुटूंबाचा अविभाज्य घटक आहे. कुटूंबातील कोणावरही संकट आलं तरी सर्वजन मिळूण संकटावर मात करतात हीच क्रांतीची परंपरा आहे सदैव राहील,असे प्रतिपादन आमदार अरूण लाड यांनी केले.
लाड म्हणाले,कोरोना काळ असो, अपघात प्रसंग असो अथवा कोणतेही संकट ओढवलेले असो क्रांती परिवार नेहमीच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी राहिलेला आहे. अनेक जण मृत्युच्या दारातून परतलेली उदाहरणे आहेत. परंतू काही वेळा नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नसते. अशाच क्रांती कुटुंबातील काही सहकाऱ्यांना आम्ही गमावले. या सर्व क्रांती परिवारातील कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांना पितृत्वाची व मायेची अनुभूती देण्याचा आजअखेर मी प्रयत्न केला आहे व पुढेही सदोदित करीत राहीन. मृत सहकाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मध्येच कुठे थांबू नये यासाठीही क्रांतीपरिवाराने नेहमीच दक्षता घेतली आहे.
आज कारखाना कार्यस्थळावर मयत कर्मचारी पोपट पाटील, मोहन पवार, उमेश थोरात, सागर गोरड यांच्या कुटूंबातील सदस्यांना तसेच दुधोंडी येथे ट्रॅक्टर अपघातामध्ये संतोष आरबुने यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना क्रांती परिवारातर्फे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.