अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा 

0
सांगली : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सांगली येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.
डि. एस. हातरोटे यांनी सुनावली. मुक्तार जाफर शेख(वय-३५ वर्षे, सध्या रा. प्रदिप पाटील यांचे घरी, जलशुध्दीकरण केंद्रामागे,येळावी वाट, तासगाव, मुळगाव टाकळी,मानूर, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.भारतीय दंड संहिता कलम ३७६(२)(एफ), ३७६(३), ३२३ अन्वये तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदयाचे कलम ६ अन्वये दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व रक्कम रुपये २५,०००/दंड, दंड न दिल्यास दोन वर्षे सश्रम कारावास व बायकोस मारहाण केली,म्हणून सहा महिने सक्तमजुरी व रक्कम रुपये ५००/- दंडाची शिक्षा सुनावली. याकामी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल श्री. अरविंद रामराव देशमुख यांनी काम पाहिले.

 

 

 

याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी ही तिचा नवरा म्हणजेच आरोपी मुक्तार जाफर शेख व पिडीत मुलगी व मुलगा यांचेसोबत सन २०१९ मध्ये जलशुध्दीकरण केंद्राचे पाठीमागे येळावी वाट, तासगाव, ता.तासगाव, जि.सांगली येथे राहत होती दिनांक २३/०४/२०१९ रोजी फिर्यादी व तिचे कुंटूबिय झोपले असताना, आरोपीने पिडीत मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीस प्रतिकार केला असता, तिला शिवीगाळ व मारहाण केली व पिडीत मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादीने तासगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.याकामाचा सखोल तपास होवून तासगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक यु. एम, दंडिले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सदर सेशन केसची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डि. एस. हातरोटे यांचे न्यायालयात सुरु होती.

 

याकामी सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. याकामी फिर्यादी, पिडीत
मुलगी तसेच वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. उपलब्ध साक्षीपुराव्या आधारे यातील आरोपी मुक्तार जाफर शेख यास त्याने अल्पवयीन पिडितेवर लैगिंक अत्याचार केल्यामुळे त्यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सदरकामी तासगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार श्री. रविंद्र माळकर व पैरवी कक्षातील पोलीस अंमलदार वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले, श्री. गणेश वाघ, तसेच सर्व पोलीस अंमलदार यांचे सहकार्य लाभले.
सदर प्रकरण हे विशेष पोक्सो न्यायालयात न्या. डि. एस. हातरोटे यांचेसमोर जलदगतीने चालून सुनावणी सुरु झाल्यापासून या प्रकरणाचा एक महिन्याच्या आत निकाल झालेला आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांना पिडीत मुलीस विशेष नुकसान भरपाई अदा करण्याबाबतचे आदेश केलेले आहेत. त्यामुळे विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या. डि. एस. हातरोटे व जिल्हा सरकारी वकिल अरविंद देशमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.