माडग्याळ,संकेत टाइम्स : म्हैसाळ योजनेतून माडग्याळसह गुड्डापूर, उटगी व उमदी या गावासाठी पाणी सोडण्यात यावे,अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
म्हैसाळ योजनेतून बंदिस्त पाइपलाइनमार्फत उमदीपर्यंत पाणी गेले आहे, माडग्याळच्या शिवेवरून पाणी गेले आहे. परंतु माडग्याळला याचा काहीही फायदा होत नाही. येथून पाणी सोडल्यास माडग्याळचा ९० टक्के भाग सिंचनाखाली येऊन नैसर्गिक ओढ्यातून दोड्डनाल्यापर्यंत पाणी जाऊ शकते.
सध्या मायथळ येथे कालव्याने पाणी आले आहे. तेथून माडग्याळ ओढा १ किलोमीटरवर आहे. यासाठी ९५० कोटी खर्च अपेक्षित आहे. यामुळे माडग्याळ,सोन्याळ, कुलाळवाडी, उटगी, दौडनाला, उमदी, व्हसपेठ या गावांना लाभ होणार आहे.
ही योजना पूर्ण होऊन शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचे जीवनात उंचावणार आहे. तरी लवकरात लवकर मंजुरी देऊन हे काम सुरू करावे, अशी मागणी जमदाडे यांनी केली आहे.