आंवढीसह तालुक्याच्या विकासात युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असलेले निश्चल,अविचल,लढाऊ आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिले जाते.नुकतेच त्यांना आदर्श संरपच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.अगदी ३८ वर्षात उद्योग व्यवसाय सोडून त्यांनी आंवढीच्या विकासाचे स्वप्न बघितले.पहिल्याच प्रयत्नात पहिले लोकनियुक्त संरपच बनले आहेत.अगदी कमी वयात थेट संरपच होण्याची किमया त्यांनी साधली आहे.
त्यांच्या वर्षभरातील कारकिर्दीचा मागोवा घेतला तर,त्यांची ही विचारधारा प्रत्यक्ष कामातून ठळकपणे दिसून येते.संताच्या उक्तीप्रमाणे ‘बोले तैसा चाले’,हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून आले आहेत. आजघडीला भारतात आणि महाराष्ट्रात तरुणांची संख्या प्रचंड आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंट असे त्याचे यथोचित नाव आहे, पण ही जी तरुणाई आहे तिच्या आशा-आकांक्षा वेगळ्या आहेत, तिच्या विचारांची पद्धत वेगळी आहे.जर का गाव,तालुका,व राज्याला प्रगती करायची असेल तर या तरुणाईला समजून घेऊन आणि तिला योग्य दिशा देऊन काम करावे लागेल.
कोडग यांचा यंग फॅक्टर,अनुभव हा प्रभावी आणि तरुणाईला साजेसा व पुढे घेऊन जाणारा आहे.त्यांनी गेल्या चार वर्षात आंवढी सारख्या गावात सिध्द करून दाखविले आहे.अखिल भारतीय संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते प्रभावी काम करत आहेत.
सामान्य कुंटुबात जन्मलेले आण्णासाहेब कोडग यांनी खाजगी जिप घेऊन प्रवाशी वाहतूकीचा व्यवसाय सुरू केला.मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मुंबईला जाऊन ट्रेलर व्यवसायात प्रवेश केला.स्व:ता चालक म्हणून काम करत तो व्यवसाय भरभराटीला आणला.यात लोकनेते स्व.पंतगराव कदम यांचे मेव्हणे बाबा शिंदे यांचे मोठे सहकार्य कोडग यांना पुरस्कार
कायम जनतेविषयी तळमळ असणारे कोडग यांनी लोकसेवेचे ब्रिद मनाशी बाळगत गावातील राजकारणात प्रवेश केला.
पहिल्याच संरपच निवडीत त्यांना जनतेने डोक्यावर घेत चाळीस वर्षाची परपंरा मोडून काढत पहिले लोकनियुक्त संरपच केले.२० नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी संरपच पदाची सुत्र हाती घेतली.तेव्हापासून त्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला आहे.दारूबंदी,पाणी फांऊडेशन, म्हैसाळ पाणी,गावातील गटारी,रस्ते,ग्रामपंचायत,शाळाच् या टोलेजंग इमारती,पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणलोटचे चार लाख वीस हजार घन मीटर काम,गावात मतदान प्रक्रियेतून दारुबंदी ,सोनंद रस्ता डांबरीकरण, मैशाळ योजनेचे पाणी, माणिकनगर रस्ता डांबरीकरण, पाणीपुरवठ्याच्या विहीरी खोलीकरण, गावाअंतर्गत रस्ते व गटारी केल्या,दलीत वस्तीत पेव्हींग ब्लॉक चे रस्ते,हायमास्ट,शाळा रंगरंगोटी,ग्रामपंचायत नवीन इमारत,ग्रामपंचायत कंपाऊंड, वाडीवस्तीवर पाण्याच्या टाक्या, पाण्यासाठी वितरण व्यवस्था,त्यांच्या कामाची पोहचपावती आहेत.
विशेष म्हणजे पाणी फांऊडेशनच्या कामाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आंवढीला भेट देत कामाची पाहणी केली होती.
आतापर्यत मिळालेले पुरस्कार– पंचायत राज्य विकास मंचाच्या (अखिल भारतीय) सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड– दैनिक लोकमत आदर्श संरपच पुरस्कार– C.B.S.न्यूजचा ‘आदर्श संरपच पुरस्कार’– कोरोना योध्दा म्हणून C.B.S. परिवाराकडून सन्मानचिन्ह,देऊन गौरव– आधार महाराष्ट्र कडून भूषण आदर्श संरपच पुरस्कार– मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन आदर्श संरपच पुरस्कारकोडग यांनी चार वर्षात केलेली विकास कामे* आवंढी गावातील विविध विकासकामे *✓पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन ४ लाख २२ हजार घनमीटर काम पाणी✓मतदान प्रक्रियेतून दारुबंदी होणारे सांगली जिल्ह्यातील पहिले गांव✓आवंढी ते माणिकनगर डांबरी रस्ता✓शिवारवस्ती व सोळगेवाडी पिण्याच्या पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था व वितरण व्यवस्था✓आवंढी ते सोनंद डांबरीकरण रस्ता✓उमेदच्या माध्यमातून गावात ४० महिला बचतगट✓ माणिकनगर व गावठान येथील विहरी खोलीकरण✓ जि. प. शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी✓ बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैशाळ योजनेचे पाणी गावात आणले✓ ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत✓ प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभार्थीना घरकूल✓ माणिकनगर येथे पिण्याच्या पाण्याची सोय व वितरण व्यवस्था✓ गावांतर्गत रस्ते व गटारी✓ दलित वस्तीमध्ये पेव्हींग ब्लॉकचे रस्ते✓ आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे दुरुस्ती कलर व पेव्हींग ब्लॉक,ग्रामपंचायत इमारतीला कंपाऊंड व वृक्षारोपन✓ जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्यासाठी पाणी
शंब्दाकन :
हणंमतराव बाबर,आंवढी