माडग्याळ सोसायटीच्या हनुमान पॅनेलच्या विजयी उमेदवाराचा सत्कार

0
माडग्याळ,संकेत टाइम्स : जत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या माडग्याळ सोसायटीवर चुरसीने झालेल्या लढतीत श्री जय हनुमान पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता मिळविली आहे.पँनेलचे ७ संचालक विजयी झाल्याने पुढील पाच वर्षासाठी सत्ता त्यांच्या ताब्यात असेल,या नवनिर्वाचित संचालकांचा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मन्नगौडा रवीपाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 

या निवडणूकीत अटातटीच्या लढतीत माडग्याळ सोसायटीच्या 13 पैकी श्री जय हनुमान पॅनेलच्या 7 तर श्री मल्लिकार्जुन पॅनेलचे 6 उमेदवार निवडून आले.श्री जय हनुमान पॅनेलचे नेतृत्व विठ्ठल निकम,प्रदीप करगणिकर, पांडुरंग निकम,आप्पू शास्त्री,राजू कांबळे यांनी केले.श्री हनुमान पॅनेलचे विजय उमेदवार,प्रदीप करगणिकर, निंगाप्पा कोरे, पांडुरंग निकम, भिमु बंडगर,श्रीमंत कोरे,आंबाना कोरे विजयी झालेत.या सर्वाचा सत्कार माजी सभापती तम्मन्नगौडा रवीपाटील यांचेहस्ते करण्यात आला.

 

यावेळी पॅनेलचे नेतृत्व करणारे मार्केट कमिटी तज्ञ संचालक विठ्ठल निकम व महादेव माळी यांचाही सत्कार तम्मन्नगौडा रवीपाटील यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना तम्मन्नगौडा रवीपाटील म्हणाले की, ‘यापुढील काळातही माडग्याळ गावाच्या विकास कामासाठी पुढाकार घेईन.
यावेळी कामान्ना बंडगर,रामनिंग निंबर्गी, डॉ.शिवानंद चनगोंड,बजरंग होकळे,लिबाजी माळी,आप्पु माळी-शास्त्री,शिवाप्पा कोरे,श्रीशैल कोरे,तुकाराम बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते .
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.