आमदार स्थानिक विकास निधीतून एस.टी.पिकअप शेडची उभारणी

0
माडग्याळ,रमेश चौगुले :
जत विधानसभा मतदार संघातील आमदार स्थानिक विकास निधीतून मौजे उटगी (जवाहर फॉर्म) येथे एस. टी. पीक अप शेडची उभारणी करण्यात आली आहे.

 

मौजे उटगी (जवाहर फॉर्म) येथे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी बऱ्याच काळापासून एस. टी. पीकअप शेडची गरज होती. या स्टॉप पासून अनेक लांब पल्ल्याच्या एस. टी. ये-जा करीत असतात. त्यामुळे प्रवाश्यांची मोठया प्रमाणावर येथे वर्दळ असते.

 

Rate Card
आजूबाजूच्या पंचक्रोशीतील प्रवाशांना देखील हे ठिकाण मध्यवर्ती आहे. या नव्या शेडच्या उभारणीमुळे स्थानिक प्रवाशांना लाभ होणार आहे.तालुक्यातील अनेक वाड्यावस्त्यावर असे पिकअप शेड उभारण्यात येणार असल्याचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.